राजर्षी छत्रपती शाहू महाराज सर्वकालीन आदर्श राजे- उपमुख्यमंत्री अजित पवार

225 0

मुंबई दि. 26 :- राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेच्या कल्याणाचा वसा व वारसा समर्थपणे पुढे नेला. उपेक्षित, वंचित घटकांना मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी सामाजिक न्यायाचा क्रांतिकारक विचार दिला. सामाजिक न्यायाचे प्रणेते, आरक्षणाच्या संकल्पनेचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सर्वकालिन आदर्श राजे होते. त्यांचे सामाजिक न्यायाचे विचार मार्गदर्शक असून त्या विचारांवरच राज्याची आजही वाटचाल सुरु आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती आणि सामाजिक न्याय दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे शेतकऱ्यांचे तारणहार, बहुजनांचे पालनकर्ते होते. आपल्या संस्थानात त्यांनी शेतकरी हिताचे कायदे केले. शेतीसाठी धरणं बांधली. बहुजनांच्या मुलांना शिक्षणाची दारं खुली करुन दिली. त्यांच्यासाठी वसतीगृहे बांधली. उद्योगाला प्रोत्साहन दिले. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. नोकरीमध्ये आरक्षण दिलं. महिलांच्या सक्षमीकरणाचे कायदे केले. सामाजिक सुधारणा करून सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला.

बहुजन समाजातील मुलांसाठी वसतिगृहे सुरु केली. बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण, स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे राजर्षी शाहू महाराज हे देशातील थोर समाजसुधारक, लोकराजा होते. सामाजिक न्यायाचे, आरक्षणाच्या संकल्पनेचे जनक असलेले राजर्षी शाहू महाराज यांच्या पुरोगामी, प्रगत, दूरदृष्टी विचारांमुळे त्यांचे विचार आपल्यासाठी नेहमीच मार्गदर्शक, प्रेरणादायी आहेत.

Share This News

Related Post

ST Bus

ऐन दिवाळीत होणार प्रवाशांचे हाल; उद्यापासून एसटी कर्मचारी संपावर

Posted by - November 5, 2023 0
  ऐन दिवाळीत एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वातील एसटी कष्टकरी…
Uddhav Nana and sharad pawar

ठाकरे गट आणखी दोन पाऊलं मागं? राऊतांनी सांगितले जागा वाटपाचे नवे सूत्र

Posted by - May 31, 2023 0
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने तयारीला सुरुवात केली आहे. मात्र या निवडणुकीवरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता…
Nagpur News

Nagpur News : नागपूर हळहळलं! अर्ध्या तासाच्या अंतराने बाप – लेकाचा मृत्यू

Posted by - January 17, 2024 0
नागपूर : नागपूरमधून (Nagpur News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच वडिलांनी देखील…

पुणे : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ऍक्शन मोडवर ; चुहा गँगच्या प्रमुखवर मोक्का अंतर्गत कारवाई

Posted by - September 12, 2022 0
पुणे : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील रेकॉर्डवरील आरोपी इस्माईल मौलाली मकानदार आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई…
Ratan Tata

Ratan Tata : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी

Posted by - December 16, 2023 0
मुंबई : मागच्या काही महिन्यांपासून मोठ्या उद्योगपतींना धमक्यांचे कॉल येत आहेत. मुकेश अंबानी, सायरस मिस्त्री यांच्यानंतर आता टाटा समूहाचे माजी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *