राज ठाकरेंविरोधात अयोध्येत शक्तिप्रदर्शन; “माफी नाही तर अयोध्येत प्रवेश नाही”

514 0

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर भाजप खासदार बृजभूषण सिंह आक्रमक झाले आहेत. राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशातील जनतेची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली होती. या मागणीवर ते ठाम आहे. ‘राज ठाकरे माफी मांगो’, ‘राज ठाकरे चूहा है’ अशा घोषणा यावेळी राज ठाकरेंविरोधात देण्यात आल्या.

उत्तर प्रदेशच्या नवाबगंजमध्ये राज ठाकरेंच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. बरेलीतील नवाबगंजमध्ये राज ठाकरेंविरोधीत काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सामील झाले होते.राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज एक बैठक पार पडणार आहे. खासदार बृजभूषण सिंह यांनी कार्यकर्ते आणि साधू, महंतांसोबत बैठकीचं आयोजन केलंय. या बैठकीत राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. राज ठाकरेंनी माफी मागितली नाही, तर त्यांना अयोध्येत पायही ठेवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका बृजभूषण सिंह आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. आता राज ठाकरे यांच्याविरोधात उत्तर भारतीयांनी जोरदार घोषणाबाजी अयोध्येत केली.दरम्यान,राज ठाकरेंविरोधात आणि त्यांच्या कृत्यांविषयी मी आधीपासून बोलतोय आणि त्यांची निंदा करतोय, असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलंय.

Share This News

Related Post

CM EKNATH SHINDE

शिंदे फडणवीस सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय

Posted by - April 5, 2023 0
शिंदे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलली असून सततचा पाऊस आता नैसर्गिक…

माजी कायदामंत्री शांती भूषण यांचं निधन; वयाच्या 97 वर्षी घेतला अखेरचा श्वास

Posted by - January 31, 2023 0
नवी दिल्ली: माजी केंद्रीय कायदा मंत्री आणि वकील शांती भूषण यांचे मंगळवारी वयाच्या 97 व्या वर्षी निधन झाले. भूषण यांनी…

4 डिसेंबर : ‘भारतीय नौदल दिवस’; जाणून घ्या आजच्या दिवसाचा रंजक इतिहास…

Posted by - December 4, 2022 0
आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. दरवर्षी 4 डिसेंबर म्हणजे आजच्या दिवशी भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो.…

तेलंगणात हेलिकॉप्टर कोसळून दोन पायलट्सचा मृत्यू, नलगोंडा जिल्ह्यात भीषण दुर्घटना

Posted by - February 26, 2022 0
नलगोंडा- तेलंगणात प्रशिक्षणार्थी हेलिकॉप्टर कोसळून दोन पायलट्सचा मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी घडली. ही घटना तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यात कृष्णा…
Cabinet Expansion

Cabinet expansion : अखेर खातेवाटप जाहीर; अजित पवारांना अर्थ खाते तर धनंजय मुंडेना कृषी खाते

Posted by - July 14, 2023 0
मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *