Heavy Rain

Rain Update : मुंबईतल्या पावसानं मोडला जुलै महिन्याचा रेकॉर्ड; 5 दिवसात पडला ‘एवढा’ मिमी पाऊस

789 0

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ (Rain Update) घातला आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. या पावसाचा (Rain Update) फटका शेतकऱ्यांनासुद्धा बसला आहे. शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे मुंबईतील जुलै महिन्यातल्या पावसाचा रेकॉर्ड यंदा मोडीत काढला असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

कुलाबा आणि सांताक्रूझ येथे अनुक्रमे 124.8 मिमी आणि 124 मिमी पावसाची नोंद हवामान खात्याने केली आहे. चर्चगेट, मरीन लाइन्समध्ये रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. दादर, माटुंगा, किंगसर्कल, लालबाग, अंधेरी, कुर्ला या ठिकाणीदेखील अशीच परिस्थिती आहे. या पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, बुधवारी मुंबईतील अतिवृष्टीने (Rain Update) जुलै 2020 मधील 1,502.6 मिमीचा विक्रम मोडला आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत एकूण 1512.7 मिमी पाऊस झाला असून, यंदाच्या जुलै महिन्यात पावसाचा नवा विक्रम नोंदवला गेला आहे. जुलै 2005 मध्ये एकूण 1454.4 मिमी पाऊस पडला होता. या महिन्यात झालेल्या पावसाच्या तुलनेत हे प्रमाण 58 मिमी कमी आहे.

Share This News

Related Post

Samruddhi Highway Accident

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात

Posted by - June 1, 2024 0
नागपूर : राज्यात अपघाताचे प्रमाण काही कमी होण्याचे नाव घेईना. समृद्धी महामार्गाचे उदघाटन झाल्यापासून हा महामार्ग अपघाताचे (Samruddhi Highway Accident)…
Crime

विदर्भ हादरला ! मदतीच्या बहाण्याने अंध पतीसमोरच अंध पत्नीवर अत्याचार

Posted by - April 6, 2023 0
महाराष्ट्राला हादरवणारी अत्याचाराची घटना अकोल्यातून समोर आली आहे. अंध पतीच्या समोरच अंध पत्नीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अमरावतीहून…

BREAKING : औरंगाबाद-नाशिक मार्गावर खासगी ट्रॅव्हल्सच्या बसला आग ; 11 जणांचा होरपळून मृत्यू, 38 प्रवासी जखमी…VIDEO

Posted by - October 8, 2022 0
नाशिक : नाशिक येथे शनिवारी पहाटे घडलेल्या भीषण अपघातानं अवघा महाराष्ट्र हादरला. चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसला लागलेल्या आगीत 11 जणांचा होरपळून…

तुम्हाला माहित आहे का ? देवाचे तीर्थ प्राशन केल्यानंतर डोळ्याला आणि मस्तकाला का लावले जाते

Posted by - December 2, 2022 0
आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर अनेक वेळा हातामध्ये तीर्थ घेतो कित्येक जणांनी केवळ आपल्या वडीलधाऱ्यांचे पाहून हातात तीर्थ घेतल्यानंतर ते प्राशन करून…

मी मरेपर्यंत शरद पवार साहेबांसोबत… जितेंद्र आव्हाडांनी दिला ‘त्या’ आठवणींना उजाळा

Posted by - February 5, 2023 0
मुंबई: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा दिला असून यामध्ये आपण मरेपर्यंत शरद पवार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *