Pradeep Sharma

Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना जामीन मंंजूर

404 0

मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना (Pradeep Sharma) सुप्रीम कोर्टाने अँटालिया स्फोटक प्रकरणात जामीन (Pradeep Sharma) मंजूर केला आहे. अँटिलिया स्फोटकं प्रकरण आणि मनसूख हिरेन खून प्रकरणात हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.मागच्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने या संदर्भातला निकाल राखून ठेवला होता. मुंबई हायकोर्टाने प्रदीप शर्मांना जामीन नाकारल्यावर शर्मांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

काय आहे नेमके प्रकरण?
25 फेब्रुवारी 2021 या दिवशी उद्योगपती मुकेश अंबानींचं निवासस्थान असलेल्या अँटालिया या इमारतीबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. या घटनेनंतर स्कॉर्पिओ मालक मनसूख हिरेन याचा मृतदेह ठाण्याजवळ खाडीत आढळला होता. यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला. यानंतर NIA ने याप्रकरणी तत्कालीन एपीआय सचिन वाझेला अटक केली होती. यानंतर या प्रकरणी प्रदीप शर्मांसह 9 जणांना एनआयएने अटक केली. प्रदीप शर्मांवर वाझेला या प्रकरणातील पुरावे मिटवायला मदत केली असल्याचा आरोप करण्यात आला होता.

Share This News

Related Post

ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी काळाच्या पडद्याआड; वयाच्या 88 वर्षी घेतला अखेरचा श्वास

Posted by - March 18, 2023 0
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन झाले आहे. अल्पशा आजाराने त्यांनी ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कोल्हापूरमधील…

“बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट ठेवत आहात का ?”, फडणवीस यांचा शिवसेनेला सवाल (व्हिडिओ)

Posted by - January 24, 2022 0
मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त संवाद साधताना काल पुन्हा भाजपवर हल्लाबोल केला. शिवसेनेची 25 वर्ष…
Buldhana News

Buldhana News : बुलढाणा हळहळलं ! महिलेची चिमुकल्यासह विहिरीत उडी; तरुण मदतीला धावला मात्र…

Posted by - November 8, 2023 0
बुलढाणा : अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. यादरम्यान बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील भरोसा या गावात एक मोठी दुर्दैवी…

ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा झटका, परमबीर सिंह यांच्या विरोधात दाखल सर्व प्रकरणं CBI कडे वर्ग

Posted by - March 24, 2022 0
मुंबई- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात दाखल असलेली सर्व प्रकरण आता राज्य सरकारकडून सीबीआयकडे वर्ग करण्यात आली…
Parshuram Ghat

Parashuram Ghat : परशुराम घाटात दरड कोसळल्यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद

Posted by - July 19, 2023 0
चिपळूण : राज्यात जुलै महिन्याच्या अखेरीस पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कोकण जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. या मुसळधार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *