वीज कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास मनाई ; राज्य सरकारने लागू केला मेस्मा कायदा

218 0

राज्यातील शासकीय वीज कंपन्यांमध्ये कार्यरत अभियंते,तंत्रज्ञ, कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी व कामगार यांनी आज रविवारी रात्री १२ वाजल्यापासून दोन दिवसीय (२८ आणि २९ मार्च) संपावर जाण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वीज कंपन्यांच्या अधिकारी-कर्मचारी या सर्वांना महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षा अर्थात मेस्मा कायदा लागू केला असून हा प्रस्तावित संप करण्यास मनाई केली आहे.

महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या शासनाच्या वीज कंपन्यांच्या अधिकारी-कर्मचारी यांच्या सेवा या अत्यावश्यक सेवा असून या अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षा अधिनियम अर्थात *मेस्मा* लागू करून त्यांना संपावर जाण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे राज्य शासनाने आज राजपत्रात प्रसिद्ध आदेशात म्हटले आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी यापूर्वीच राज्यातील वीज कंपन्यांचे कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण होणार नाही,अशी ठाम भूमिका वेळोवेळी घेतली आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या वीज क्षेत्राच्या खासगीकरणाच्या प्रयत्नांनाही राज्याच्या ऊर्जा विभागाने, राज्य सरकारने तीव्र विरोध केला आहे. उन्हाळ्यातील वाढलेले तापमान,१० आणि १२ वीच्या परीक्षा,विविध पीकांना पाण्याची असलेली गरज या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला अखंड वीज पूरवठा मिळावा म्हणून वीज कंपन्यांच्या अधिकारी- कर्मचारी यांनी संपावर जाऊ नये असे आवाहनही यानिमित्ताने राज्य शासनाने केले आहे.

Share This News

Related Post

कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; एकनाथ शिंदेचं आवाहन

Posted by - June 30, 2022 0
राज्यात अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर अखेर महाविकास आघाडी सरकार कोसळलं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासह आपल्या विधान परिषद…
Yamini Jadhav

Yamini Jadhav : दक्षिण मुंबईमधून यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर

Posted by - April 30, 2024 0
मुंबई : दक्षिण मुंबईमधून यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांना महायुतीकडून तिकीट जाहीर करण्यात आले आहे. या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे…

DELHI : सार्वजनिक ठिकाणी पुन्हा मास्क सक्ती ; अन्यथा 500 रुपयांचा दंड

Posted by - August 11, 2022 0
दिल्ली : दोन वर्ष कोरोनाने जगभरात अक्षरशः थैमान घातलं . कोरोनाने देशभरात अनेक जीव घेतले , संपूर्ण जनजीवन अस्थिर करून…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वाढलेल्या भरमसाठ शुल्कासंदर्भात विद्यार्थ्यांचे बेमुदत घंटानाद आंदोलन

Posted by - July 11, 2022 0
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वाढलेल्या भरमसाठ शुल्कासंदर्भात विद्यार्थ्यांचे बेमुदत घंटानाद आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी वारंवार निवेदने देऊन देखील प्रशासनाकडून…

भाजप आमदार गणेश नाईक यांचा पोलिसांकडून शोध, अटकेची टांगती तलवार

Posted by - April 20, 2022 0
नवी मुंबई- भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचे आरोप केले आहेत. त्यावरून नाईक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *