Pandhari Sheth

Pandhari Sheth Phadke : बैलगाडा शर्यतींचा बेताज बादशाह पंढरीशेठ फडके यांचे निधन

730 0

मुंबई : पंढरीशेठ फडके (Pandhari Sheth Phadke) विहिघरवाला, बिनजोड छकडेवाला… या गाण्याप्रमाणे रायगडसह संपूर्ण महाराष्टाभर आपले नाव करणारा बैलगाडा शर्यतींचा बेताज बादशाह पंढरीशेठ फडके यांनी अकाली एक्सिट घेतली आहे. दीर्घ आजाराने लाखो चाहत्यांचा ‘शेठ’ हिरावून नेल्याची हळहळ संपूर्ण महाराष्ट्रात व्यक्त होत आहे. पंढरीशेठ फडके हे पनवेल तालुक्यातील विहिघर गावचे रहिवासी होते. बैलगाडा शर्यतींवर त्यांचे प्रचंड प्रेम होते. कोरोना काळात बैलगाडा शर्यतींना बंदी घालण्यात आली होती.

मात्र महाराष्ट्र बैलगाडा शर्यत संघटनेचे अध्यक्ष असलेले पंढरीशेठ फडके यांनी या काळात अनेक मंत्री, आमदार, खासदारांचे उंबरठे झिजवले आणि शर्यती सुरु करण्यास अपार मेहेनत घेतली. बैलगाडा शर्यती सुरु झाल्या. मात्र बदलापूरमध्ये मागील वर्षी 2 गटात झालेल्या गोळीबारात प्रतिस्पर्धी राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केल्याच्या आरोपातून पंढरीशेठ फडके यांना जेलवारी करावी लागली. नुकतेच ते जेलमधून बाहेर आले होते. आता पुन्हा नव्या जोमाने ते नवी इंनिंग सुरु करत असतानाच अचानक त्यांना आजारपणाने ग्रासले.

पंढरीशेठ फडके यांना मधुमेहाचा प्रदीर्घ आजार होता. नुकतेच त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पाय कापण्यात आल्याने त्यांना त्यांचे सहकारी उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असत. मात्र पंढरीशेठ यांनी हार मानली नव्हती. त्याच उत्साहात ते आपली बैलगाडाची आवड जोपासत आपल्या चाहत्यांच्या आग्रहात्सव अनेक शर्यतींना भेटी देत असत मात्र दिनांक 21 फेब्रुवारी रोजी दीर्घ आजाराने त्यांना गाठलेच आणि लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे पंढरीशेठ अनंतात विलीन झाले आहेत. या वृत्ताने त्यांच्या लाखो चाहत्यांमध्ये शोककळा पसरली असून प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Accident News : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू

Pimpri-Chinchwad : पिपरी- चिंचवडमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

Maratha Reservation : मनोज जरांगेंनी पुन्हा उगारले आंदोलनाचं अस्त्र

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील मोरवाडी परिसरात टायरच्या गोडाऊनला भीषण आग

Parbhani News : महावितरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर ! शॉक लागून 3 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमणाच्या कारवाईदरम्यान पोलीस आणि नागरिकांमध्ये जोरदार राडा

Pune Crime : पुण्याचं उडता पंजाब होतंय का? आतापर्यंत पुणे पोलिसांकडून 2000 किलो एमडी ड्रग्ज जप्त

Zeeshan Siddique : काँग्रेसकडून झिशान सिद्दीकीची मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हकालपट्टी

Ameen Sayani Pass Away: रेडिओच्या सुवर्णयुगाचे शिल्पकार अमीन सयानी यांचे निधन

Share This News

Related Post

Chandrapur News

Chandrapur News : खळबळजनक ! घात कि अपघात ? दोन दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या तरुणाचा अचानक आढळला मृतदेह

Posted by - October 26, 2023 0
चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur News) जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. चंद्रपूर शहरात अनेक प्राचीन वास्तू आहेत. या वास्तू…
Nagpur Crime News

Nagpur Crime News : नागपूर हादरलं! पेंढरी गावात एकाच दोराने गळफास घेऊन प्रेमीयुगलाची आत्महत्या

Posted by - September 5, 2023 0
नागपूर : प्रेमात, नैराश्यात तरुणांनी धक्कादायक पाऊलं उचलल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील. अशीच एक धक्कादायक घटना नागपूरमध्ये (Nagpur Crime…
Cabinet Decision

Cabinet Decision: गौरी गणपती आणि दिवाळीत मिळणार 100 रुपयांत आनंदाचा शिधा; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

Posted by - August 18, 2023 0
मुंबई : दिवाळीप्रमाणेच गौरी गणपती, दिवाळीसाठी राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ (Anandacha Shidha) देण्याचा निर्णय आज पार पडलेल्या…
Bribe News

Bribe News : नांदेड महानगरपालिकेचा लिपिक ACB च्या जाळ्यात; 20 हजारांची लाच घेताना अटक

Posted by - September 3, 2023 0
नांदेड : नांदेड महानगरपालिकेमधून एक मोठी बातमी (Bribe News) समोर आली आहे. यामध्ये मनपाच्या स्थानिक संस्था कर विभागातील लिपिकासह अन्य…
Nagpur News

Nagpur News : नागपूर हळहळलं ! ‘या’ कारणामुळे चिमुकलीसह वृद्ध व्यक्तीचा दुर्दैवी अंत

Posted by - September 13, 2023 0
नागपूर : नागपूर जिल्ह्यात (Nagpur News) 2 मन हेलावून टाकणाऱ्या घटना घडल्या आहेत. यामध्ये विजेच्या धक्क्यामुळे चिमुकलीसह एका वृद्ध व्यक्तीला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *