Ravikant Tupkar

Onion Export Tax : कांद्यावरील 40 % निर्यात शुल्क मागे घ्या,अन्यथा केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांच्या दिल्लीतील घरात कांदा फेकणार : रविकांत तुपकरांचा इशारा

628 0

बुलढाणा : केंद्र सरकारने कांद्यावर 40 % निर्यात कर (Onion Export Tax) लादून आणखी एक शेतकरी विरोधी निर्णय घेतला आहे. ज्यावेळी सोयाबीन-कापसाचे भाव पडले त्यावेळी केंद्र सरकारने भाव (Onion Export Tax) वाढविण्यासाठी हस्तक्षेप केला नाही, मात्र आता टोमॅटो,कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे पडत आहे, असे दिसताच अनेकांच्या पोटात दुखायला लागले. केंद्र सरकारनेही लगेच भाव नियंत्रणात आणण्यासाठी निर्यात शुल्क वाढविण्यास सुरवात केली. विशिष्ट मतदारवर्ग टिकवण्यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने शेतकर्‍यांना मारण्याचे धोरण राबविले जात आहे.

कांदा ही काही जीवनावश्यक वस्तू नाही, कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मरणार नाही, त्यामुळे जर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे पडणार असतील तर कोणाच्या पोटात दुखण्याच कारण काय..?

केंद्र सरकारच्या या धोरणांचा निषेध करत केंद्र सरकारने तातडीने 40% निर्यात शुल्कचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी कांदा फेकू, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी दिला आहे.

Share This News

Related Post

राहुल शेवाळे प्रकरणातील पीडितेचे फेसबुक लाईव्ह केल्याप्रकरणी महिला आयोग राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांच्यावर करणार कारवाई

Posted by - December 26, 2022 0
पुणे : राहुल शेवाळे प्रकरणातील पीडितेचे फेसबुक लाईव्ह केल्याप्रकरणी महिला आयोग राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांच्यावर कारवाई करन्यात येणार आहे.…

मोठी बातमी : नवाब मलिक यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला

Posted by - November 30, 2022 0
मुंबई : मुंबई सत्र न्यायालयाने आज नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब…

#ACCIDENT : नवले पुलावर पुन्हा अपघात; डंपरची दुचाकीला धडक; दुचाकी स्वाराचा मृत्यू

Posted by - January 20, 2023 0
पुणे : पुण्यातील नवले पुलावर भुमकर चौकात आज मोठा अपघात घडला आहे. एका भरधाव डंपरने एका दुचाकी स्वाराला धडक दिली.…
Kalubai Temple

Kalubai Temple : काळूबाईचे मंदिर ‘या’ कारणामुळे 5 दिवस राहणार बंद

Posted by - January 6, 2024 0
सातारा : महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणा-या सातारा जिल्हयातील वाई तालुक्यातील मांढरदेव गडावरील काळुबाई देवीचे (Kalubai Temple) मंदिर…

अर्थकारण : मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक नियोजन करताना दमछाक होतेय ? हा लेख वाचा, मदत मिळेल

Posted by - January 27, 2023 0
अर्थकारण : मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक नियोजन करताना मुलांच्या आवडीनिवडी जाणून घेऊन त्या शाखेतील शिक्षणाचा सध्याचा खर्च किती आहे, हे पाहावे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *