Dhananjay Munde

Onion Export Duty : कांद्याच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी धनंजय मुंडेंनी थेट दिल्ली गाठली

466 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने देशांतर्गत महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी कांद्यावरील निर्यातशुल्क (Onion Export Duty) 40 टक्क्यांपर्यंत वाढवल्याने राज्यातील (Onion Export Duty) राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापले आहे.40 टक्क्यांचे निर्यातशुल्क रद्द व्हावे, यासाठी शेतकरी संघटना आणि राजकीय पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत. यंदाच्या कांदा निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा 50 टक्क्यांपेक्षाही जास्त असल्याने निर्यातशुल्काचा सर्वाधिक फटका राज्याला बसणार आहे. त्यामुळे केंद्राच्या या निर्णयाचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस-पवार सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहे.

कांद्याचा मुद्दा आणखी चिघळला तर अवघड परिस्थिती निर्माण होऊ शकते, याचा अंदाज आल्यानंतर राज्य सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यासाठी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज सकाळी थेट दिल्ली गाठली. याठिकाणी मुंडे यांनी केंद्रीय वाणिज्य आणि ग्राहक संरक्षण मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये कांद्यावरील 40 टक्क्यांचे निर्यातशुल्क रद्द करण्यासंदर्भात चर्चा झाली.

या बैठकीमध्ये केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे. ₹2410 प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येईल. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल असे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे सांगितले आहे.

Share This News

Related Post

Manoj Jarange

Manoj Jarange Patil : ‘माझे हे शेवटचे उपोषण…’ मनोज जरांगेनी सरकारला दिला इशारा

Posted by - June 12, 2024 0
जालना : सगे सोयरे शब्दाची अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केलं…

राज्य सरकारच्या ‘या’ एका निर्णयामुळे पुणे महानगरपलिकेचे सुमारे दीड कोटी पाण्यात

Posted by - August 7, 2022 0
पुणे: महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी यावर्षी ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी आतापर्यंत सुमारे दीड कोटी रुपये खर्च झाला…
Pune Video

Pune Video : रुग्णांचा जीव वाचविणाऱ्या रुग्णवाहिकेनेच घेतला वृद्ध व्यक्तीचा जीव

Posted by - July 10, 2023 0
पुणे : रुग्णवाहिका हि रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी असते. मात्र पुण्यामध्ये (Pune Video) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये चक्क एका…
Robbery News

Robbery News : दर 2 वर्षांनी महाराष्ट्रातील ‘या’ बँक शाखेत पडतो दरोडा

Posted by - December 9, 2023 0
चंद्रपूर : आपण चित्रपटात अनेक वेळा बँक दरोडे, बँक चोरी आणि बँक फोडीचे प्रकार बघितले असतील. यामधील कथानक कशाप्रकारे बँकेवर…

वाहतूक कोंडी टाळण्यासाठीच्या उपाययोजनांना गती द्या; पुणे शहरातील रस्त्यांच्या कामांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून आढावा

Posted by - March 27, 2023 0
पुणे : पुणे शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा आढावा घेऊन वाहतूक कोंडी कमी करण्याच्यादृष्टीने करावयाच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *