OBC Reservation

OBC Reservation : 6 वर्षानंतर ओबीसींच्या आरक्षणाबाबत रोहिणी आयोगाचा अहवाल राष्ट्रपतींकडे सुपूर्द

377 0

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) फायद्यासंबंधित त्रुटी सुधारण्यासाठी स्थापन केलेल्या रोहिणी आयोगाने (Rohini Committee) आपला अहवाल आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला आहे. तब्बल 6 वर्षानंतर रोहिणी आयोगाने हा अहवाल सादर केला आहे.

रोहिणी आयोगाचा अहवाल राष्ट्रपतींकडे सुपूर्द
6 वर्षानंतर रोहिणी आयोगाने राष्ट्रपतींकडे अहवाल सादर केला आहे. त्यामुळे आता मंडल आयोगाने निर्माण केलेल्या मागासवर्गीय आरक्षणाचा आराखडा नव्याने तयार करायचा का, हा निर्णय सरकारला घ्यावा लागणार आहे. रोहिणी आयोगाने आपला अहवाल राष्ट्रपतींना सादर केल्याचे अधिकृत प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आले आहे. या अहवालात नेमके काय आहे हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

नेमका काय आहे रोहिणी आयोग?
ओबीसींच्या उप-वर्गीकरणासाठी 2017 मध्ये रोहिणी आयोगाची स्थापना करण्यात आली होती. सुमारे सहा वर्षे 14 वेळा मुदतवाढ दिल्यानंतर ओबीसी उपवर्गीकरण आयोगाने सोमवारी आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी आपला अहवाल सादर केला. दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती जी रोहिणी यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलची नियुक्ती इतर मागासवर्ग आयोगाने ओबीसींच्या उप-वर्गीकरणाची तपासणी करण्यासाठी केली होती. 2 ऑक्टोबर 2017 रोजी रोहिणी आयोगाची स्थापना करण्यात आली होती.

Share This News

Related Post

शिवसेना नेते,माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात

Posted by - June 5, 2022 0
उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परांडाचे शिवसेनेचे आमदार माजी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला वरवंड येथे पुणे सोलापूर महामार्गावर अपघात झाला असून…
Weather Update

Weather Update : राज्यातील ‘या’ भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी; हवामान खात्याने दिला इशारा

Posted by - May 11, 2024 0
पुणे : ऊन पावसाचा खेळ संपूर्ण राज्यात सुरु असताना पुढचे चार दिवस राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान…

Aurangabad News : घरच्यांनी गावी सोबत न नेल्याने मुलाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - August 13, 2023 0
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये (Aurangabad News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये पालकांनी आपल्या मुलाला गावी जाताना सोबत नेलं (Aurangabad…

मनसे-भाजप युती होणार ? चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टच सांगितले…….

Posted by - April 14, 2022 0
राज्यात परत भाजप मनसे युतीची चर्चा सुरू झाली असली तरी त्यावर असा कुठलाही प्रस्ताव नाही आमची 13 जणांची कोअर टीम…

सभा भव्य दिव्य होणार, पोलीस केसेस अंगावर घेण्यास आम्ही तयार- अमित ठाकरे

Posted by - April 30, 2022 0
औरंगाबाद- मशिदीवरील भोंग्यांना विरोध आणि हनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित करून आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *