sharad pawar

Sharad Pawar : शरद पवार यांचे बंडखोरांवर थेट कारवाईचे संकेत

512 0

मुंबई : राज्याच्या राजकारणात आज मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज राष्ट्रवादीशी बंडखोरी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते गेले असल्यामुळे हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या 9 जणांनी मंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठींबा नाही असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हंटले आहे. अजित पवारांसह इतर इतर आमदारांनी घेतलेली भूमिका चुकीची आहे.भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णयसुद्धा चुकीचा आहे . अजित पवारांसह इतर आमदारांनी घेतलेली भूमिका हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. ज्यांनी ही पक्षविरोधी भूमिका घेतली त्यांच्यावर योग्य कारवाई करण्याचे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत.

अजित पवारांच्या बंडावर काय म्हणले शरद पवार
पक्षाच्या धोरणाशी विसंगत पावलं टाकणे , हे पक्षाच्या दृष्टीने योग्य नसून , यावर पक्षाचे प्रमुख लोकं बसतील आणि योग्य निर्णय घेतील. फक्त एकच आहे, हा निकाल एकटा व्यक्ती घेणं योग्य नाही. त्यामुळे बाकीचे सहकाऱ्यांशी चर्चा करून, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, इतर सगळ्यांशी आम्हाला बोलणं करावं लागेल असं शरद पवार यांनी सांगितलं.

पक्ष विरोधी भूमिका घेणाऱ्यांवर कारवाई करावी लागेल’
आताच काही दिवसांपूर्वी पक्षातील काही जणांवर जबाबदारी टाकण्यात आली होती . उदाहरणार्थ कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल , जनरल सेक्रेटरी सुनील तटकरे यांची नियुक्ती केलेली आहे. या सगळ्या प्रकारात त्यांनी पक्षाच्या हिताच्या दृष्टीकोनातून जी पावलं त्यांनी टाकणे गरजेचे होते. ती त्यांनी टाकलेली नाहीत त्यामुळे पक्ष नेतृत्वाला त्यांच्यावर विश्वास राहिला नाही . त्यामुळे मला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल”, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.

Share This News

Related Post

Sudha Murty

Sudha Murty : सुधा मूर्तींची राज्यसभेवर नियुक्ती; राष्ट्रपतींनी केली घोषणा

Posted by - March 8, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रसिद्ध लेखिका, ‘इन्फोसिस फाउंडेशन’च्या प्रमुख आणि आपल्या समाजकार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सुधा मूर्तीं (Sudha Murty) यांची…

7th Pay Commission : जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची; मोदी सरकारचे नवीन आदेश

Posted by - October 31, 2022 0
नवी दिल्ली : सरकारने काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती. अशातच आता केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन आदेश…
Manoj Jarange Patil Protest

Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे पाटलांना ‘या’ कारणामुळे मुंबई हायकोर्टाने बजावली नोटीस

Posted by - January 24, 2024 0
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेला मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil Protest) यांचा मोर्चा पुण्यात पोहचला आहे. या…

थेऊरच्या यशवंत सहकारी साखर कारखान्याला आग, चोरीसाठी अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची शक्यता

Posted by - January 25, 2022 0
पुणे- पुण्याजवळील थेऊर इथं गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला यशवंत सहकारी साखर कारखाना एका अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *