Sharad Pawar And Supriya Sule

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यावर पक्षविरोधी कारवाई करावी; सुप्रिया सुळेंचे पवारांना पत्र

565 0

मुंबई : अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवारांच्या बंडाला ज्या लोकांनी पाठिंबा दिला आहे. त्या सर्व राष्ट्रवादीच्या नेत्या-पदाधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येणार आहे. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय पातळीवर नेत्यांवर कारवाईसाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्राद्वारे विनंती केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी पत्रात म्हटलं की, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी 2 जुलै 2023 रोजी पक्षाच्या घटना आणि नियमांचे उल्लंघन करून पक्षाचे सदस्यत्व सोडलं आहे. त्यामुळे ते अपात्र ठरले आहेत. त्यामुळे माझी शरद पवारांना विनंती आहे की, त्यांनी तात्काळ कारवाई करावी. तसेच पक्षविरोधी कार्यवाही केल्याप्रकरणी भारतीय राज्यघटनेच्या 10 व्या अनुसूची अंतर्गत संसद सदस्य प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या विरोधात सक्षम प्राधिकाऱ्यासमोर अपात्रतेची याचिका दाखल करावी.

Share This News

Related Post

#PUNE : पानशेत पुरग्रस्त पुनर्वसित सहकारी सोसायटींच्या भाडेपट्टा जमिनीसंदर्भात राज्यशासन सकारात्मक – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - March 20, 2023 0
मुंबई : पुणे जिल्ह्यातील सन १९६१ च्या पानशेत पुरानंतर विस्थापीत झालेल्या लोकांच्या पुनर्वसित सहकारी सोसायट्यांना भाडेपट्याने देण्यात आलेल्या जमिनी संदर्भात…

जावेद अख्तर देणार ‘पिफ २०२२’ मध्ये विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान

Posted by - February 27, 2022 0
ज्येष्ठ कवी, गीतकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते जावेद अख्तर यंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान देणार…

वेळेत पोहोचले नाही तर परीक्षा देता येणार नाही ! दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो ही महत्त्वाची बातमी वाचाच…

Posted by - February 2, 2023 0
महाराष्ट्र : तुम्ही जर यावर्षी दहावी किंवा बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. माध्यमिक आणि…
Pune PMC Water Supply News

Pune Water : पुण्यातील पाणीकपातीसंदर्भात घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - February 24, 2024 0
पुणे : पुणेकरांसाठी (Pune Water) एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आज उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *