Garba

Navratri 2023 : नवरात्रौत्सवसाठी राज्य सरकारच्या नव्या गाइडलाइन जारी

1618 0

मुंबई : मुंबईसह राज्यभरात नवरात्री (Navratri 2023) मोठ्या प्रमाणात साजरी केली जाणार आहे. नवरात्रीत मोठ्या प्रमाणात गरबा-दांडियाचे आयोजन केले जाते. यासाठी सरकारकडून आता नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

काय आहेत नव्या गाइडलाइन?
मुंबईसह राज्यभरात नवरात्रीच्या निमित्ताने रास दांडियाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना सहभागी लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. राज्यातील सर्व दांडिया आयोजकांना यंदा आयोजनाच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका तैनात ठेवणे बंधनकारक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

रास दांडिया खेळताना अनेकदा लोक भान विसरून नाचतात, अशावेळी काही वेळा हृदयावर अतिरिक्त ताण येऊन हृदयविकाराचा झटका येण्यासारख्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. अनेक अहवालानुसार, कोरोना कालखंडानंतर अनेकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याचे समजले आहे. त्यामुळे अनेक जीवनशैली विकार असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कोणतीही वैद्यकीय परिस्थिती उदभवल्यास त्या व्यक्तीला तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असते. ही गरज लक्षात घेऊनच मुख्यमंत्र्यांनी अशी सुविधा सर्व आयोजकांनी यावेळी उपलब्ध करून द्यावी असे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Share This News

Related Post

विद्यार्थ्यांनो बोर्ड परीक्षेदरम्यान झेरॉक्स दुकाने राहणार बंद; कॉपी प्रकरणाला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम !

Posted by - February 14, 2023 0
लवकरच दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा घेतल्या जाणार आहेत. दरम्यान कॉपी प्रकरणाला आळा घालण्यासाठी राज्य मंडळांना एक विशेष मोहीम आखली…

चार्टर्ड प्लेन मधील फोटोंबद्दल विचारल्यावर नितीन देशमुखांची बोलती बंद

Posted by - June 23, 2022 0
मुंबई- शिवसेना आमदार नितीन देशमुखांनी आपण सुरत कशी सुटका करून घेतली, कसाबसा जीव वाचवून परत आलो, याची रंजक कहाणी बुधवारी…
Crime

मित्रांवर प्रभाव टाकण्यासाठी खडकवासला धरण क्षेत्रात केली बंदुकीनं फायरिंग; तीन तरुणांवर गुन्हा दाखल

Posted by - April 18, 2023 0
मित्रांवर प्रभाव टाकण्यासाठी खडकवासला धरण क्षेत्रात बंदुकीनं फायरिंग करणं तीन तरुणाच्या चांगलंच अंगलट असून याप्रकरणी तीन तरुणावर हवेली पोलीस ठाण्यात…
LokSabha

TOP NEWS मराठीचा स्पेशल रिपोर्ट : ‘या’ आहेत देशातील ‘टॉप 10 हाय वोल्टेज’ लढती; दिग्गज नेत्यांपुढे विजयाचं आव्हान

Posted by - March 29, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकल्यापासून महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच लढतींचा आढावा आपण घेतलेला आहे. मात्र आज आपण देशातल्या टॉप टेन…
Gas Cylinder

Cylinder Price Hike : दिवाळीपूर्वी सिलिंडरच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवीन दर

Posted by - November 1, 2023 0
नवी दिल्ली : आजपासून नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाई (Cylinder Price Hike) संदर्भात मोठी बातमी समोर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *