Nagpur News

Nagpur News : आरटीई नियमांना उच्च न्यायालयात आव्हान; शिक्षण विभागाला लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश

257 0

नागपूर : सरकारच्या बदललेल्या आरटीई नियमांमुळे इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळेत (Nagpur News) आरटीई अंतर्गत प्रवेशाची वाट कठीण झाली असून पालकांत मोठ्या प्रमाणात संतापाचे वातावरण दिसते. महाराष्ट्र सरकारच्या या नव्या आरटीई नियमांना उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. ज्येष्ठ वकील ॲड. जयना कोठारी, ॲड. दीपक चटप, ॲड. पायल गायकवाड, ॲड. ऋषिकेश भोयर यांच्या माध्यमातून शिक्षण हक्कांवर काम करणाऱ्या संस्था व कार्यकर्त्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या शिक्षण विभागाला नोटीस बजावली असून 8 मे पर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले.

आरटीईअंतर्गत वंचित, दुर्बल, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांतील विद्यार्थ्यांना 25 टक्के राखीव जागांवर प्रवेश दिले जातात. शालेय शिक्षण विभागाने यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. त्यानुसार विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. यातील उपलब्ध शाळा नसल्यास स्वयंअर्थसहाय्यित खासगी शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. नुकतेच आरटीईचे ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहे. या नियमांची अंमलबजावणी झाल्यास विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

नव्या नियमांमुळे श्रीमंतांच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळा तर गरीब मुलांसाठी शासकीय शाळा अशी वर्गवारी तयार होईल. याआधी हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, उत्तरप्रदेश आदी राज्यांत खासगी शाळांत मुभा देणारे नियम तेथील सरकारने तयार केले. मात्र तसे नियम हे उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. 2009च्या शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी विनाअनुदानित शाळांना मुभा देता येत नाही. खासगी शाळांना वेळेत परतावा दिल्यास त्यांचा देखील विरोध होणार नाही. राज्य सरकारचे नवे नियम बेकायदेशीर व अन्यायकारक असल्याचे मत याचिकाकर्त्यांचे वकील ॲड. दीपक चटप यांनी मांडले. आरटीईतील बदलांमुळे बव्हंशी इंग्रजी माध्यमांच्या विना अनुदानित खासगी शाळेत प्रवेश मिळणार नसल्याने गरीब विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहावे लागेल असे मत याचिकाकर्ते शिक्षण हक्क कार्यकर्ते वैभव एडके, राहुल शेंडे, वैभव कांबळे, अनिकेत कुत्तरमारे यांनी व्यक्त केले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : संपत्ती लुबाडण्याचा काँग्रेसचा कट; भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

Loksabha : महायुतीत ‘या’ जागेचा तिढा अद्यापही सुटेना; 1 जागा अन् 3 इच्छुक?

Ruturaj Gaikwad : धोनीला ‘जे’ 17 वर्षांत जमलं नाही ‘ते’ ऋतुराजने पहिल्याच वर्षांत केले

RBI : आरबीआयची आणखी एका बँकेवर कारवाई ! ‘या’ बँकेतून ग्राहकांना काढता येणार नाही पैसे

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुण्यातील सभेची जागा बदलली; आता ‘या’ ठिकाणी होणार सभा

Shikhar Bank Loan Case : शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना क्लीन चीट

Share This News

Related Post

बळीराजा खचू नको..धैर्याने संकटाला समोरे जा..शासन आहे पाठीशी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Posted by - October 20, 2022 0
मुंबई : नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा…
Pradeep Sharma

Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना जामीन मंंजूर

Posted by - August 23, 2023 0
मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना (Pradeep Sharma) सुप्रीम कोर्टाने अँटालिया स्फोटक प्रकरणात जामीन (Pradeep Sharma) मंजूर केला आहे. अँटिलिया…

मोठी बातमी ! ओबीसी आरक्षणाशिवाय होणार महापालिका निवडणुका; त्रुटी राहील्याने सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा अहवाल फेटाळला

Posted by - March 3, 2022 0
देशभरात चर्चेत असलेल्या ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला…
Ratnagiri Crime

Ratnagiri Crime : भावाला फोन करुन म्हणाली मी उद्या गावी येतेय, मात्र 2 दिवसांनी तरुणीचा आढळला मृतदेह

Posted by - August 2, 2023 0
दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri Crime) दापोली तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये दापोलीहून चिपळूण येथे आपल्या गावी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *