Mumbai Police

Mumbai Police : दसऱ्यानिमित्त मुंबई पोलिसांनी नागरिकांना ‘हा’ खास संदेश देत दिल्या शुभेच्छा

473 0

मुंबई : आज राज्यात सगळीकडे उत्साहात दसरा साजरा केला जात आहे. दसऱ्यानिमित्त (Mumbai Police) घरोघरी आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांचे तोरण बनवून दारावर लावण्यात येते. तसेच पाटी किंवा वहीवर सरस्वतीचे चित्र काढून, घरातील स्त्रिया सोने, लहान मुले, तरुण मंडळी वह्या-पुस्तके, नोकरी करणारे त्यांचे लॅपटॉप, कॉम्प्युटर अथवा घरातील अवजारे आदी सर्व मांडून त्यांच्याकडून पूजा केली जातात आणि आपट्याची पाने एकमेकांना दिली जातात. या सणाच्या निमित्ताने मुंबई पोलिसांनीसुद्धा दोन पोस्ट शेअर करून, दसऱ्याच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई पोलिसांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात आपण पाटी किंवा वहीवर सरस्वतीचे चित्र रेखाटतो, त्याप्रमाणे चित्र रेखाटले आहे. तसेच विशेष म्हणजे सरस्वती काढल्यानंतर 15 त्रिकोण दिसत आहेत. त्या प्रत्येक त्रिकोणात एक-एक वाहतुकीचे चिन्ह चित्रित केले आहे.या चिन्हांमध्ये शाळा/विद्यालय, अरुंद रस्ता, पादचारी ओलांडणे, अरुंद पूल, असमान रस्ता, ट्रॅफिक सिग्नल किंवा वाहतूक संकेत, रस्त्याचे काम सुरू, उजवीकडे वळा, काटकोनी जोडरस्ता, निसरडा रस्ता, डावीकडे यू टर्न, धोकादायक खोल रस्ता, उभा चढ आदी चिन्हांचा समावेश आहे.

मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत @mumbaipolice या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या पोस्ट शेअर केल्या आहेत.वाहतूक चिन्हे महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे प्रवास करताना या चिन्हांचे महत्त्व आणि वाहतुकीचे नियम माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. वेळोवेळी या गोष्टीची मुंबई पोलिस त्यांच्या हटके पद्धतीने प्रवासी आणि नागरिकांना आठवण करून देत असतात. आज त्यांनी दसरा आणि विजयादशमीच्या निमित्ताने अशा अनोख्या आणि खास शुभेच्छा दिल्या आहेत.

Share This News

Related Post

लालपरी पूर्वपदावर ! पुणे विभागातील तब्बल 4 हजार कर्मचारी कामावर हजर

Posted by - April 23, 2022 0
एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी मागील पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता.   त्यानंतर उच्च न्यायालयाने…
Mumbai-Pune Expressway

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एसटी बसचा भीषण अपघात

Posted by - December 7, 2023 0
पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज सकाळच्या सुमारास एका एसटी बसचा भीषण अपघात (Mumbai-Pune Expressway) झाला. एक्स्प्रेस वेवरील अंडा पॉईंटजवळ…
Eknath Shinde

बनावट ‘CMO अधिकाऱ्या’चा शिक्षण संस्थांना गंडा; मुख्यमंत्र्यांच्या नावाने द्यायचा प्रवेश

Posted by - May 25, 2023 0
पुणे : काही दिवसांपूर्वी भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष जे.पी. नड्डा (JP Nadda) यांच्या नावाने आमदारांना मंत्रिपदाचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या आरोपीला…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्रैमासिक ‘शिक्षकमित्र’ या विशेषांकाचं प्रकाशन

Posted by - February 27, 2022 0
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्रैमासिक ‘शिक्षकमित्र’ या विशेषांकाचं राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्रैमासिक…

रघुनाथ कुचिक प्रकरणी माझ्यावरील आरोप धादांत खोटे, चित्रा वाघ यांचे पुणे पोलिसांना पत्र

Posted by - April 18, 2022 0
मुंबई- शिवसेना नेते रघुनाथ कुचिक प्रकरणात माझ्यावर करण्यात आलेले सगळे आरोप धादांत खोटे आहेत, असं स्पष्टीकरण भाजप नेत्या चित्रा वाघ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *