Mumbai News

Mumbai News : आझाद मैदान येथे आजपासून महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे भव्य धरणे आंदोलन

584 0

मुंबई : परिचारिका संवर्ग हा अत्यंत सेवाभावी वृत्तीने सेवा देणारा, बहुतांश महिला कर्मचारी असलेला संवर्ग असून सन, उत्सव बाजूला ठेवून रात्र पाळी करणारा २४*७ सेवा शुश्रुषा करणारा संवर्ग गेले अनेक वर्ष व्यावसायिक व वैयक्तिक पातळीवर असंख्य समस्यांना तोंड देत सेवा देत आहे. राज्यातील या संवर्गाचे प्रतिनिधित्व करणारी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, ही राज्यातील परिचारिकांच्या संवेदनशील मागण्यांसाठी सनदशीर मार्गाने कार्य करीत आहे. परिचारिकांच्या अनेक महत्वाच्या मागण्यांसाठी संघटनेच्या स्तरावरून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे. राज्यातील परिचारिकांनी आपल्या अतिसंवेदनशील न्यायिक व रास्त मागण्यांसाठी कधीही शासनास वेठीस धरले नाही.

कोव्हीडसह सर्वच वैश्विक महामारीच्या काळात,आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक,जबाबदाऱ्या, बाजूला ठेवून, कुटुंब व मुलांबाळापासून दूर राहून, जिवाची पर्वा न करता, डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून रुग्णांना परिचारिकांनी सेवा दिली आणि आजही देत आहेत. म्हणूनच त्यांना रुग्णसेवेचा कणा असे संबोधले जाते. परंतु त्यांच्या मागण्याकडे आजतागायत प्रशासन व शासन पुर्णतः दुर्लक्ष होत आहे, संघटनेने वारंवार पाठपुरावा करूनही आजतागायत एकही मागणी पुर्ण झाली नाही. राज्यातील विविध वैद्यकीय संस्थामध्ये परिचारिका संवर्गाची कायमस्वरूपी पदे भरण्यात येत आहे त्याबद्दल राज्यातील परिचारिका शासनाचे आभार व्यक्त करत आहेत.

परंतु, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य विभाग, राज्य कामगार विमा रुग्णालये ईत्यादी विभागातील परिचारिकांच्या इतर प्रमुख मागण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही अद्यापपर्यन्त कार्यवाही झाली नाही. सदर खालील मागण्यांसाठी दि.२२ फेब्रुवारी २४ पासून बेमुदत धरणे आंदोलन व उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
१.सार्वजनिक आरोग्य विभागाने २०२१ मध्ये मंजूर केलेल्या सेवाप्रवेश नियमातील जाचक अटी रद्द करणे. परिवीक्षाधीन कालावधी खंडित करण्यासाठी लादण्यात आलेली परीक्षा रद्द करणे,
२.वैद्यकीय शिक्षण विभागातील शुश्रुषा, शैक्षणिक,व प्रशासकीय अशा विविध स्तरावरील पदोन्नती मागील ४ वर्षात करण्यात आलेल्या नाहीत. विविध स्तरावरील ५०% हून अधिक पदोन्नतीने भरावयाची रिक्तपदे तातडीने भरण्यात यावी.
३.सर्व शासकीय परिचर्या विद्यालयात प्राचार्य-उपप्राचार्य, सेवाप्रवेश मंजूर करण्यात यावे. नविन वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तज्ञ परिसेविकांची पदनिर्मिती करणे, ४. परिचारिकांची ४० वर्षापासून प्रलंबित असलेले भत्ते केंद्र शासनाप्रमाणे मंजूर करून लागू करणे,
५.राज्य शुश्रुषा सेल स्थापन करणे,
६.परिचारीका संवर्गाचे कंत्राटीकरण थांबविणे,
७.परिचर्या संवर्गातील पदविका/पदवी प्राप्त परिचारिकांना केंद्रशासनाप्रमाणे शैक्षणिक वेतनवाढी देणे.,
८.राज्यातील परिचारिकांचा वैयक्तिक व सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी व्यावसायिक उन्नतीसाठी पदनाम बदल करणे. ९.परिचारीकांना सरसकट प्रशासकीय बदली मधून वगळून फक्त विनंती व तक्रार आधारित प्रशासकीय बदली करावी, १०.परिचारिकांच्या संख्येच्या तुलनेत निवासस्थान राखीव ठेवणे, राज्यातील
११.सर्व रुग्णालयामध्ये पाळणाघर उपलब्ध करुन देणे. १२.विद्यार्थी परिचारीकांचे मागील ५० वर्षांपासून न वाढलेल्या विद्यावेतनामध्ये वाढ करणे. वरील सर्व मागण्यांची दखल न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र होईल व नाईलाजास्तव राज्यव्यापी काम बंद आंदोलन करण्यात येईल. अशी माहिती महाराष्ट्र राज्य परिचारीका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pankaja Munde : ‘तोपर्यंत फेटा बांधणार नाही’; जाहीर सभेत पंकजा मुंडेंनी केला निर्धार

Viral Video : चालकाला हार्ट अटॅक आल्याने बोलेरोने 8 जणांना चिरडलं

Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; हिंदुजा रुग्णालयात दाखल

WPL 2024 : उद्यापासून रंगणार महिला प्रिमीयर लीगचा थरार

Lok Sabha Election 2024 : मविआचे जागावाटप अंतिम टप्प्यात; ‘या’ दिवशी होणाऱ्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब

Mohammed Shami : मोहम्मद शमी आयपीएलमधून बाहेर

PM Kisan : PM किसानचा 16 वा हफ्ता ‘या’ दिवशी येणार शेतकऱ्यांच्या खात्यात

Sangli News : सांगली हादरलं ! 2 नातवांनी आईसह मिळून केली आजीची हत्या

Akola News : बहिणीसाठी कायपण ! परीक्षेला कॉपी पुरवण्यासाठी भाऊ बनला तोतया पोलीस; मात्र ‘ती’ चूक पडली महागात

Sharad Pawar : ‘शेवटचा डाव…’ जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याने चर्चेला उधाण

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : अकॅडमीच्या संचालकाने ‘तू काळी आहेस’ म्हणून हिणवल्याने तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल

Viral Video : नागपूरमधील माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला; घटना CCTV मध्ये कैद

Resident Doctor : प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून पुन्हा राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप

Share This News

Related Post

राणा दांपत्याला मुंबई पोलिसांची बजावली १४९ ची नोटीस

Posted by - April 22, 2022 0
मुंबई- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हनुमान चालिसा पठण करण्यासाठी आज मुंबईत दाखल झाले आहेत.…

रघुनाथ कुचिक यांचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी प्रक्रिया सुरू – चित्रा वाघ

Posted by - June 11, 2022 0
पुणे- शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर एका तरुणीने बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी पुण्यात राजकारण तापले होते. भाजपच्या…

बंडानंतर एकनाथ शिंदे यांची आली पहिली प्रतिक्रिया, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत

Posted by - June 21, 2022 0
मुंबई -एकनाथ शिंदेंच्या राजकीय बंडानंतर आता त्यांच्या प्रत्येक हालचालीवर राज्याचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांनी जवळपास 20 तासानंतर पहिली…
Nagpur News

Nagpur News : नागपूरमध्ये एमआयडीसीत भीषण स्फोट; 6 जण जखमी

Posted by - March 23, 2024 0
नागपूर : नागपूरमधून एक धक्कादायक (Nagpur News) घटना समोर आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील बुटीबोरी एमआयडीसीत असलेल्या इंडोरामा कंपनीमध्ये मोठा स्फोट…
Sharad Pawar

Sharad Pawar : बैठकीत भावूक झालेल्या ‘त्या’ नगराध्यक्षांसाठी पवार थेट जाफराबादमध्ये

Posted by - June 7, 2023 0
जाफराबाद : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Elections) अनुषंगाने सोमवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जाफराबादच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *