Heavy Rain

Monsoon Update : राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने दिली ‘ही’ मोठी अपडेट

516 0

पुणे : सध्या राज्यात पावसाने (Monsoon Update) मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणचे नदी- नाले तुडुंब भरून वाहताना दिसत आहेत. या पावसामुळे काही ठिकाणी पूर आला आहे. गावच्या गावे उध्वस्त झाली (Monsoon Update) आहेत. अनेकांच्या घरात पुराचं पाणी शिरल्यामुळे त्यांचा संपूर्ण संसार वाहून गेला आहे. यामुळे लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली आल्यानं बळीराजावर दुबार पेरणीचं संकट ओढावलं आहे. यातच आता नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील काही दिवस पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे.

सरासरीपेक्षा 17 टक्के अधिक पाऊस
राज्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका हा कोकण आणि विदर्भाला बसला आहे. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 17 टक्के अधिक पाऊस झाला आहे. कोकण, गोव्यात सरासरीच्या 36 टक्के अधिक पाऊस झाला आहे, तर मराठवाडा आणि विदर्भात सरासरीच्या 15 टक्के जास्त पाऊस झाला आहे. तर अहमदनगर, सांगली, सातारा, जालना, अमरावती या जिल्ह्यांमध्ये अद्याप पाहिजे तेवढा पाऊस अजून झालेला नाही.

काय आहे हवामानाचा अंदाज?
हवामान विभागाने (Monsoon Update) दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, पुणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Share This News

Related Post

पंतप्रधानांचा कार्यक्रम वारकरी संप्रदायाचा होता की भाजपचा ? अंकुश काकडे यांचा सवाल

Posted by - June 14, 2022 0
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू येथे संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यात उपमुख्यमंत्री…

बागेश्ववर बाबानं पुन्हा उधळली मुक्ताफळं; म्हणाले साईबाबा….

Posted by - April 2, 2023 0
नेहमी काही ना काही वक्तव्ये करून चर्चेत राहणारे बागेश्वर धामचे महंत पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले…
Manoj Jarange

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केली ‘ही’ नवी मागणी

Posted by - March 1, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारनं मराठा समाजासाठी (Maratha Reservation) दहा टक्के आरक्षण मंजूर केलं आहे. मात्र तरी देखील मराठा आंदोलक…
Solapur Fire

Solapur Fire : अन्नपूर्णा टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग; अग्निशामक दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

Posted by - April 3, 2024 0
सोलापूर : सोलापूरमधून (Solapur Fire) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूरमधील अक्कलकोट एमआयडीसी टेक्सटाईल कंपनीला भीषण आग लागली आहे.एमआयडीसीतील…
Sarthi Scholarship

Sarthi Scholarship : मराठा विद्यार्थ्यांना मोठी संधी, सारथी शिष्यवृत्तीसाठी मागवण्यात आले अर्ज

Posted by - November 9, 2023 0
पुणे : मराठा समाजाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी महाराष्ट्र सरकारने पुण्यात (Sarthi Scholarship) छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *