मुंबईत मनसेच्या कार्यक्रमादरम्यान स्टेज कोसळला, राज ठाकरे सुरक्षित ( व्हिडिओ )

198 0

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यक्रमा दरम्यान सभेसाठी उभारण्यात आलेले व्यासपीठ कोसळल्याची घटना घडली आहे. मुंबईतील गोरेगाव परिसरात ही घटना घडली आहे. या व्यासपीठावरून राज ठाकरे भाषण देणार होते. राज ठाकरे व इतर नेते सुरक्षित असून या अपघातात कोणालाही फारशी दुखापत झाल्याचे वृत्त नाही.

आज मुंबईत चांदिवली आणि गोरेगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण शाखेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चांदिवली येथील शाखेचे उद्घाटन केल्यानंतर राज ठाकरे हे गोरेगाव पूर्व येथे दाखल झाले. यावेळी स्थानिक पक्ष कार्यकर्ते आणि नागरिकांची गर्दी होती. राज ठाकरे येणार असल्याने स्टेज बांधण्यात आला होता. मात्र, हाच स्टेज कोसळला. क्षमतेपेक्षा अधिक कार्यकर्ते स्टेजवर आले आणि त्यामुळे हा स्टेज कोसळला असल्याचं बोललं जात आहे.

स्टेज कोसळल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. तसेच काळजी घेण्याचा सल्लाही दिला. त्यानंतर राज ठाकरेंनी भाषण सुद्धा केलं. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी निघून गेले.

Share This News

Related Post

Murlidhar Mohol

Murlidhar Mohol : पदभार स्विकारताच मोहोळ ‘ॲक्शन मोड’मध्ये ! पुण्याच्या प्रश्नांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत बैठक

Posted by - June 14, 2024 0
पुणे : केंद्रीय राज्यमंत्रिपदाचा सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचा कार्यभार स्विकारताच मुरलीधर मोहोळ ‘ॲक्शन मोड’मध्ये असून पुण्याच्या प्रश्नांबाबत त्यांची…

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ‘या’ 5 केंद्रीय मंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल ; ६ ऑगस्ट रोजी सुनवाई , वाचा सविस्तर प्रकरण …

Posted by - July 30, 2022 0
मुझफ्फरपूर (बिहार) : बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह अर्थमंत्री…

ठोस पुराव्याच्या अभावी कुख्यात गुंड गजा मारणेला जामीन

Posted by - April 4, 2023 0
व्यावसायिकाकडे वीस कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेला कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.…

फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांचा कुलाबा पोलीस ठाण्यात जबाब

Posted by - March 23, 2022 0
मुंबई- फोन टॅपिंग प्रकरणी पुण्याचे माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला मुंबईच्या कुलाबा पोलिस स्टेशन मध्ये दुसर्‍यांदा जबाब नोंदवण्यासाठी हजर झाल्या…

हरितालिका व्रत का करतात ?

Posted by - August 30, 2022 0
हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारीकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *