Raj Thackeray

Mumbai News : 2 महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावा; सुप्रीम कोर्टाचे व्यापाऱ्यांना आदेश

1027 0

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांना 2 महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश ( Marathi Shop Signboards) दिले आहेत. प्रकरण उच्च न्यायालयामध्ये गेलं तर भुर्दंड भरावा लागेल असेदेखील कोर्टाने स्पष्ट केलं आहे. कोर्टाच्या या निर्णयाचे मनसेकडून स्वागत करण्यात आले आहे. कोर्टाने दिलेल्या या निर्णयावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?
“पुढील 2 महिन्यांत महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापनांवर मराठी पाट्या लागल्याचं पाहिजेत असा स्पष्ट निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार! ‘मराठी पाट्या’ या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला त्याला आजच्या निर्णयाने एक मान्यताच मिळाली,” असे राज ठाकरे म्हणाले. तसेच त्यांनी याबद्दल मराठी पाट्यांसाठी आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांचं अभिनंदनसुद्धा केले आहे.

मराठी भाषा मंत्र्यांनी केलं निर्णयाचं स्वागत
मराठी भाषा मंत्री आणि राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. “मराठी पाट्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे स्वागत करतो. मराठी पाट्यांसंदर्भात शासन सातत्याने प्रयत्नशील असते मात्र काही व्यापारी याला विरोध करत न्यायालयात जातात. आता न्यायालयानेच यांना चपराक दिलेली आहे. हे मराठी भाषिक राज्य आहे इथे दुकानांवर मराठी भाषेत पाट्या पाहिजेत,” असं केसरकर म्हणालेत.

Share This News

Related Post

महत्वाची बातमी : मतदारांच्या वतीने एकनाथ शिंदे प्रकरणात दाखल हस्तक्षेप याचिकेला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता; मतदारांची बाजू देखील ऐकून घेतली जाणार

Posted by - November 1, 2022 0
दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकीय पेचप्रसंगातून सर्वोच्च न्यायालयात पोहचलेल्या अनेक याचिकांमध्ये आता नागरिकांतर्फे हस्तक्षेप याचिका दाखल करून नागरिक व मतदारांचे म्हणणे…
Akola News

Akola Crime : संपत्तीच्या वादातून काका-काकूकडून पुतण्याची हत्या

Posted by - September 2, 2023 0
अकोला : संपत्तीच्या वादातून कुटुंबातील एकाची हत्या केल्याची घटना अकोल्यातील (Akola Crime) पातूर तालुक्यातील भंडारज खुर्द याठिकाणी घडली आहे. मिलिंद…
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : छ. संभाजीनगरातील 6 कामगारांचा जळून मृत्यू झालेल्या कंपनीबाबत ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Posted by - January 2, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसीत सनशाइन एंटरप्रायजेस या कंपनीला भीषण आग लागल्याची (Chhatrapati Sambhajinagar) घटना रविवारी घडली होती. या घटनेत…

दहशतवादी हल्ल्याने इसराइल हादरलं! 100 हून अधिक नागरिकांनी जीव गमावल्याची भीती

Posted by - October 7, 2023 0
इस्त्रायलच्या तीन शहरांवर गाझा पट्टीतून हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्याची जबाबदारी पॅलेस्टानी संघटना हमासने स्वीकारली आहे. इस्रायलसह अश्कलोन आणि…
sharad pawar

शरद पवारांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला; शरद पवार अध्यक्षपदी कायम

Posted by - May 5, 2023 0
पुणे : मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात एक मोठा बदल पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *