Raj Thackery

‘हिंदू धर्म इतका कमकुवत आहे का?’ राज ठाकरेंनी त्र्यंबकेश्वर वादावरुन फटकारलं

347 0

नाशिक : काही दिवसांपूर्वी नाशिक (Nashik) मधील त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) घडलेल्या प्रकाराबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी आपले मत मांडले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पायरीवर संदलचा धूप फिरवण्याची परंपरा वर्षानुवर्षे सुरु असेल तर ती थांबवण्यात अर्थ नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हिंदू-मुसलमानांमध्ये अशाप्रकारे सख्याच्या गोष्टी सुरु आहेत.

या गोष्टी सुरुच राहिल्या पाहिजेत. इतर धर्माचा माणूस आपल्या मंदिरात आला म्हणून हिंदू धर्म भ्रष्ट होईल, इतका तो काही कमकुवत आहे का, असा परखड सवाल विचारत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी त्र्यंबकेश्वर प्रकरणावरुन रान उठवणाऱ्यांना फटकारले आहे. अशा परंपरा या सुरु ठेवल्या पाहिजेत. पण त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेल्या प्रकाराकडे चुकीच्या नजरेने पाहणाऱ्यांची वृत्ती कोती आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिराबाबतचा निर्णय स्थानिक ग्रामस्थांनी घ्यावा. बाहेरच्या लोकांनी त्यामध्ये पडू नये, अशा स्पष्ट शब्दांत राज ठाकरे यांनी त्र्यंबकेश्वर प्रकरणावरुन रान उठवणाऱ्यांना सुनावले आहे.

Share This News

Related Post

RAIN ALERT : पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली ; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा (VIDEO)

Posted by - August 8, 2022 0
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्र व मुक्त पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यातील पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांच्या…

पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांची बदली

Posted by - August 18, 2022 0
पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)चे आयुक्त सुहास दिवसे यांची राज्य शासनाने गुरुवारी बदली केली आहे.त्यांच्या जागी राज्याच्या महिला…
Manoj Jarange

Manoj Jarange : “सरकार कोसळलं तर आरक्षण…”, संजय राऊतांच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले…

Posted by - November 3, 2023 0
मुंबई : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी मराठा आरक्षणासाठी चालू केलेलं बेमुदत उपोषण गुरुवारी मागे घेतलं. यावेळी त्यांनी सरकारला…

“माझ्यावर प्रश्न चिन्ह उभे करणाऱ्यांना उत्तर द्यावे म्हणून ते बॅनर’…!” वसंत मोरेंनी व्हिडिओ ट्विट करून विरोधकांना दिले उत्तर

Posted by - December 10, 2022 0
पुणे : काही दिवसांपासून मनसे नेते वसंत मोरे हे पक्षावर नाराज असल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. अनेक वेळा ते दुसऱ्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *