महाविकास आघाडीतील मंत्री राज्यपालांच्या भेटीला; ओबीसी आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता

115 0

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात सायंकाळी भेट घेतली. विधानसभा अध्यक्षाची निवडणूक, राज्यपाल निर्वाचित 12 सदस्यांची नेमणूक तसेच ओबीसी आरक्षणाबाबत आज दोन्ही सदनात पारित केलेल्या विधेयकाबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

नऊ मार्चला विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेण्यात यावी. याबाबतचे पत्र महाविकास आघाडी सरकारकडून याआधीच राज्यपालांना देण्यात आल आहे. मात्र, अद्याप राज्यपालांकडून विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीबाबत कोणतेही निर्देश देण्यात आले नसल्याने महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी राज्यपालांची आज भेट घेतली.ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने केलेल्या सुधारित विधेयकामुळे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग सुकर होण्यासाठी मध्यप्रदेशातील कायद्याच्या धर्तीवर राज्य सरकार कायदा करत आहे. याबाबतचे विधेयक दोन्ही सभागृहात पारित झाले असून या विधेयकाबाबत राज्यपालांचीसोबत दोन्ही मंत्र्यांनी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.

Share This News

Related Post

खारघर येथील सदोष मनुष्यवधप्रकरणी विधीमंडळाचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा

Posted by - April 19, 2023 0
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील १४ श्रीसदस्यांचे मृत्यू हे सरकारच्या बेजबाबदार व नियोजनशून्य कारभारामुळे झाले आहेत. प्रसार माध्यमात येत असलेल्या बातम्या पाहता…

कात्रज परिसरात आढळला जळालेल्या अवस्थेतील तरुणाचा मृतदेह

Posted by - April 14, 2022 0
पुणे- कात्रजच्या दरीमध्ये एका तरूणाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. प्राथमिक…

चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस उलटली, नंदुरबार जिल्ह्यातील घटना

Posted by - April 12, 2023 0
चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हाइडरला धडकून उलटली. या अपघातात बसमधील १५ प्रवासी जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.…
Pune Metro

Pune Metro : लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने पुणे मेट्रोच्या वेळेत एकदिवसीय बदल

Posted by - November 9, 2023 0
पुणे : रविवार, दिनांक 12 नोव्हेंबर 2023 रोजी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने पुणे मेट्रोची सेवा सकाळी 6 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत असेल.…

नारायण राणे यांच्या अधिश बंगल्यावर कारवाई होणार का ? मुंबई हायकोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष

Posted by - March 22, 2022 0
मुंबई- मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यामध्ये वाद पेटला आहे. नारायण राणे यांच्या जुहू…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *