Manoj Jarange Patil

Maratha Reservation : मनोज जरांगे आंदोलन मागे घेणार? सरकारचं शिष्टमंडळ घेणार जरांगे पाटलांची भेट

963 0

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला होता. मात्र 40 दिवस देऊनदेखील मराठा आरक्षण न मिळाल्याने जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. एकीकडे शांततेत हे आंदोलन सुरु असताना काही ठिकाणी मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान आज सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. ओबीसी व गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, आमदार नारायण कुचे यांचा या शिष्टमंडळात समावेश आहे. जरांगे पाटील यांना शिष्टमंडळाच्या वतीनं सर्वपक्षीय नेत्यांच्या ठरावाची प्रत देण्यात येणार आहे. तसेच आरक्षणासाठी सरकारला थोडा वेळ देण्यात यावा त्यासाठी उपोषण मागे घ्यावं, अशी विनंतीही हे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांना करणार आहे.

यामुळे सरकारचे शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात काय चर्चा होते. सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करतात का?, मनोज जरांगे आपले आंदोलन मागे घेणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सध्या पार्श्वभूमीवर ही भेट खूप महत्वाची असणार आहे.

Share This News

Related Post

सेवा विकास बँक कर्ज घोटाळा प्रकरणी पुन्हा ईडीची कारवाई; पुणे, पिंपरी येथे छापे

Posted by - April 5, 2023 0
सेवा विकास बँक कर्ज घोटाळा प्रकरणी पुन्हा ईडीने कारवाई केली आहे. पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी आणि काळेवाडी फाटा परिसरात चार ठिकाणी आणि…

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ : महिला सन्मान योजनेचा जिल्ह्यात ३ लाखाहून महिला प्रवाशांनी घेतला लाभ

Posted by - March 24, 2023 0
पुणे : राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत…

Salman Khan : सलमान खानच्या घरासमोर अंदाधुंद गोळीबार; CCTV फुटेज आले समोर

Posted by - April 14, 2024 0
मुंबई : अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली…
Farmer Suicide

Farmer Suicide : धक्कादायक ! बँकेची नोटीस येताच शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

Posted by - December 11, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे (Farmer Suicide) प्रमाण वाढताना दिसत आहे. बँकेची कर्ज परतफेडीची नोटीस आल्याने पैठण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *