eknath shinde

Maratha Reservation : मागासवर्ग आयोगातर्फे 23 जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणार सर्वेक्षण

1294 0

मुंबई : मराठा समाजाचे (Maratha Reservation) सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत २३ जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणाऱ्या सर्वेक्षणासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याची तसेच या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कालबद्धरितीने अचूक सर्वेक्षण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज निर्देश दिले. गावोगावी दवंडी द्या, सूचना फलकांवर माहिती द्या, लोकांना या सर्वेविषयी कळू द्या असे निर्देशही त्यांनी दिले. ते आज वर्षा निवासस्थानी मराठा आरक्षणविषयक बैठकीत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते.

या बैठकीस निवृत्त न्या. दिलीप भोसले, निवृत्त न्या. मारोती गायकवाड, निवृत्त न्या. संदीप शिंदे, महसूल अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे, नगरविकास प्रधान सचिव डॉ के एच गोविंदराज, इतर मागास विभागाचे सचिव अंशू सिन्हा, विधि व न्याय सचिव श्री कलोते, यांची उपस्थिती होती. प्रारंभी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव ( साविस) सुमंत भांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आजवर घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाचे काम २३ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंत होणार असून मराठा व बिगर मराठा खुला प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात येईल अशारीतीने राज्यातील अंदाजे अडीच कोटी कुटूंबांचे सर्वेक्षण होणार आहे. याकामी गोखले इन्स्टिट्युट, आयआयपीएस, या नामांकित संस्थांची मदत होणार आहे.

सामाजिक भावनेने काम करण्याचे आवाहन
मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्यशासन कटीबध्द असून प्रशासनाने सुध्दा या अतिशय महत्वाच्या कामामध्ये पूर्णशक्ती एकवटून एक सामाजिक भावनेने हे काम करावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

गावोगावी दवंडी द्या, सूचना फलकांवर माहिती द्या
यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला निर्देश दिले. ते म्हणाले की, हे सर्वेक्षण अतिशय महत्वाचे असून तीनही शिफ्ट्समध्ये काम करावे. गावोगावी या सर्वेक्षणाबाबत दवंडी द्या, ग्रामपंचायतीच्या फलकांवर सुचना द्या तसेच विविध माध्यमातून लोकांना याविषयी माहिती द्या. सर्वेक्षणाला येणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक घरातून माहिती मिळाली पाहिजे म्हणजे परिपूर्ण आणि बिनचूक सर्वेक्षण होईल. सर्वेक्षणाच्या काळात तहसीलदार आणि सर्व संबंधितांनी दररोज आपल्या कामच अहवाल द्यायचा आहे.

२४ तास कॉल सेंटर सुरु ठेवा
यावेळी गोखले इन्स्टिट्यूटचे श्री अजित रानडे यांनी सर्वेक्षणाबाबत माहिती दिली. शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, तलाठी असे सव्वा लाख पेक्षा जास्त प्रगणक आठ दिवसात हे काम पूर्ण करणार आहे असे ते म्हणाले. ३६ जिल्हे, २७ नगरपालिका, ७ कॅन्टोनमेंट क्षेत्रात प्रशिक्षण आजपासून सुरु झाले आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, प्रगणकांचे तसेच अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण अतिशय व्यवस्थितपणे करा तसेच आपल्या अहवालात देखील प्रशिक्षण सत्र, बैठका या सर्व बाबींचे रेकॉर्ड ठेवा. न्या गायकवाड अहवालातील त्रुटी दूर करणे गरजेचे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, २००८ मधील अहवाल आणि सध्याचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल यात नेमका काय फरक आहे आणि नव्याने कसा हा इंटेन्सिव्ह डेटा संकलित करण्यात येत आहे हे व्यवस्थित तयार करण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

वंशावळीसाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती करा
कुणबी नोंदीबाबत वंशावळी जुळविणे महत्वाचे असून नोंदीची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी बार्टी तसेच इतर सक्षम संस्थेच्या तज्ज्ञांचे पथक तातडीने नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले. या पथकात मोडी भाषा तज्ज्ञ, तहसीलदार यांचा समावेश करा. ज्या गावांत अत्यल्प नोंदी सापडल्या आहेत तिथे परत खातरजमा करण्यासाठी विशेष मोहीम राबवा, दवंडी द्या, तसेच पोलीस पाटील व खासगी व्यक्तींकडे काही कागदपत्रे असतील तर तीही स्वीकारा असे मुख्यमंत्री म्हणाले.

ऑक्टोपासून १ लाख ४७ हजार कुणबी प्रमाणपत्रे वितरीत
निवृत्त न्या, संदीप शिंदे यांच्या समितीने काम सुरु केल्यापासून १ लाख ४७ हजार कुणबी नोंदी प्रमाणपत्रे संबंधिताना वितरीत करण्यात आले आहेत. एकट्या मराठवाड्यात ३२ हजार नोंदी आढळल्या असून १८ हजार ६०० कुणबी प्रमाणपत्रे दिली आहेत. न्या संदीप शिंदे समितीने लातूर, मराठवाड्यात बैठकीची दुसरी फेरी पण पूर्ण केली आहे अशी माहिती सुमंत भांगे यांनी यावेळी दिली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Kangana Ranaut : ‘अयोध्या म्हणजे आपली व्हॅटिकन सिटी…’, कंगणा राणावतचे वक्तव्य

Amit Shah : भारत-म्यानमार सीमेवरील मुक्तसंचार बंद; गृहमंत्री अमित शाहांची मोठी घोषणा

IPLची टायटल स्पॉन्सरशिप टाटाकडेच; 5 वर्षांसाठी मोजले ‘एवढे’ कोटी

Sharad Pawar : ‘नवरा जर रुबाब करत असेल तर..’ शरद पवारांनी महिलांना दिला ‘हा’ सल्ला

Viral Video : गुलाबी शरारा फेम ‘त्या’ शिक्षिकेने राम लल्लाच्या गाण्यावर धरला विद्यार्थांसोबत ठेका

Bhausaheb Rangari Ganapati : अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन

Tea : चहा पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती आहे?

Satara News : खळबळजनक ! राजवाडा परिसरात अर्धनग्नावस्थेत आढळला जळालेला मृतदेह

MPSC Result : कोशिश करनेवालों कभी हार नहीं होती! ‘एवढ्या’ वेळा अपयश येऊनदेखील पूजा वंजारीने MPSC मध्ये मारली बाजी

Maratha Reservation : मराठा आरक्षणाला मुळ ओबीसींचा बारा बलुतेदारांचा विरोध नाही – सोमनाथ काशिद

Pune News : मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने मायलेकरांचा वाचवला जीव

Reliance Industries : मुकेश अंबानींने घेतला मोठा निर्णय ! देशभरातील रिलायन्सच्या…

Share This News

Related Post

Ajit Pawar

Ajit Pawar : ‘ही’ काका-पुतण्याची जोडी फुटली; ठाकरेंकडून अजितदादांना मोठा धक्का

Posted by - January 21, 2024 0
पुणे : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार…

सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले अजूनही व्हेंटिलेटरवर; प्रकृती पुन्हा खालावली

Posted by - November 26, 2022 0
पुणे : अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर सुमारे २० दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या निधनाची अफवा…

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार? उद्धव ठाकरेंनी बोलावली महत्त्वाची बैठक

Posted by - February 19, 2023 0
मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगांना धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात…
Farmer

Farmer : शेतकऱ्यांसाठी पुढील 8 दिवस चिंताजनक; कृषी आयुक्तांनी दिली ‘ही’ महत्त्वपूर्ण माहिती

Posted by - June 21, 2023 0
मुंबई : पाऊस लांबणीवर पडल्यामुळे शेतकऱ्यांसाठी (Farmer) पुढील 8 दिवस खूप चिंताजनक असणार आहेत. येत्या आठ दिवसांत मान्सून सक्रीय होण्याची…

भोंग्याच्या मुद्द्यावरून मनसेच्या नाराज मुस्लिम कार्यकर्त्यांची वसंत मोरे यांनी घेतली भेट

Posted by - April 6, 2022 0
पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावरून आव्हान देत मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी दंड थोपटले. त्यानंतर हा भोंग्याचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *