Manoj Jarange

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या ‘त्या’ गोष्टीमुळे इम्प्रेस झाले मुख्यमंत्री; सर्वांसमोर केलं कौतुक

355 0

मुंबई : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वात झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला अखेर यश मिळालं. मराठा आरक्षणासाठीच्या असलेल्या मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत.यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना ज्युस आणि पेढा भरवून त्यांचं उपोषण सोडवलं. या सगळ्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांच्या एका गोष्टीमुळे मुख्यमंत्री शिंदे इम्प्रेस झाले. त्या गोष्टीचे त्यांनी सर्वांसमोर कौतुकदेखील केले.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?
“आज सकल मराठा समाजाच्या एकजुटीचा आणि मराठा समाजासाठी न्याय मागण्यासाठी संघर्ष ज्यांनी केलं, त्या मनोज जरांगे पाटील यांचं मी अभिनंदन करतो. सगळ्या देशाचं नाही तर जगाचं लक्ष या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाकडे लागलं होतं. आपली एकजूट आपण कायम ठेवली आणि अतिशय संयमपणे शिस्तीने हे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलं. मनोज जरांगे यांच्या शिस्तीचा बडगा पाहायला मिळाला. कुठंही गालबोट न लावता हे आंदोलन यशस्वी केलं, आपल्या आंदोलनाचा त्रास इतर कुणालाही होऊ नये याची काळजी घेतली, शांततेच्या मार्गानं आंदोलन केलं, यासाठी मी मनोज जरांगे पाटील यांना मनापासून धन्यवाद देतो” दिलेला शब्द पाळणं ही माझी कार्यपद्धती आहे. आज आमच्या दिघे साहेबांची जयंती, बाळासाहेबांची जयंती 23 तारखेला झाले. या माझ्या दोन्ही गुरुवर्यांचे आशीर्वाद आणि सकल मराठा समाजाच्या शुभेच्छा माझ्या पाठिशी आहेत असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

आज आमचं हे सरकार म्हणजे तुमचं सरकार मनोजदादा हे सर्वसामान्यांचं, माताभगिनींचं, कष्टकऱ्यांचं सरकार आहे. आम्ही मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतले आहेत. सर्वसामान्यांना न्याय देणारे निर्णय आतापर्यंत घेतले आहेत. या मराठा समाजाचा संघर्ष आहे अनेक लोकांना मोठं केलं नेते केलं पदं मिळाली परंतु मराठा समाजाला न्याय देत असताना संधी आली तेव्हा संधी द्यायला हवी होती. आजचा दिवस तुमचा दिवस तुमच्या विजयाचा दिवस गुलाला उधळण्याचा दिवस आहे. मी आपल्या प्रेमापोटी आज या ठिकाणी आलो, आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि आज मनोजदादांनी सर्व आपल्या भाषणात सांगितलं, लाखो कुणबी नोंदी आता सापडू लागल्या, सरकारची मनसिकता आणि इच्छाशक्ती देण्याची आहे. हे देणारं सरकार आहे घेणारं नाही असेदेखील एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maratha Reservation : मराठा आंदोलनाला अखेर यश ! पहाटेच्या सुमारास सरकारकडून अध्यादेश जारी

Ajit Pawar : ‘…तेव्हाच भाजपबरोबर सरकारमध्ये जायचं ठरलं’; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Manoj Jarange : नवी मुंबईत येताच मनोज जरांगेंची तब्येत बिघडली

Chandrapur Crime : चंद्रपूर हादरलं ! ठाकरेंच्या कट्टर युवासेना शहर प्रमुखाची निर्घृणपणे हत्या

CIDCO : गुडन्यूज! सिडकोकडून ‘एवढ्या’ घरांसाठी लॉटरी जाहीर

Republic Day 2024 : मुंबईतील वाहतुकीत बदल; ‘हे’ रस्ते वाहतुकीसाठी असणार बंद

Share This News

Related Post

Buldhana Accident

Buldhana Accident : मलकापूर शहरात दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; 7 जणांचा जागीच मृत्यू

Posted by - July 29, 2023 0
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून (Buldhana Accident) मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये मलकापूर शहरातील महामार्ग क्रमांक 6 वरती दोन ट्रॅव्हल्सचा…
BJP

Nashik Loksabha : नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का ! ‘हा’ नेता भरणार अपक्ष उमेदवारी अर्ज

Posted by - May 1, 2024 0
नाशिक : नाशिकच्या राजकीय (Nashik Loksabha) वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची…
Nanded Accident

Nanded Accident : नांदेडमध्ये भीषण अपघात; एका क्षणात हसत्या खेळत्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत

Posted by - May 24, 2024 0
नांदेड : नांदेडमधून एक भीषण अपघाताची (Nanded Accident) घटना समोर आली आहे. यामध्ये एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला…

#Budget 2023 : आठवीपर्यंत मोफत गणवेश मिळणार !

Posted by - March 9, 2023 0
मुंबई : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या अर्थसंकल्पातून शिक्षणासाठी मोठी तरतूद केली आहे. विद्यार्थ्यांचा सरकारी शाळांकडील ओढा वाढावा म्हणून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *