Maratha Reservation

Maratha Reservation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात गोंधळ; मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे

961 0

यवतमाळ : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापलं आहे. मराठा आंदोलक आता आक्रमक होताना दिसत आहेत. मराठा आंदोलकांनी बीडच्या माझलगाव येथे प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याची जाळपोळ केल्यानंतर आता यवतमाळमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने यवतमाळच्या दौऱ्यावर आहेत. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्यासमोर मराठा समाजाचे आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

एकनाथ शिंदे यवतमाळमध्ये दाखल झाल्यानंतर रस्ते मार्गाने कार्यक्रमस्थळी येत होते. यावेळी काही मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर कार्यक्रम सुरु झाल्यानंतर कार्यक्रमामध्येच गोंधळ घालण्यात आला. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांना तातडीने ताब्यात घेतलं आहे.

Share This News

Related Post

RASHIBHAVISHY

वृश्चिक राशीची संध्याकाळ आज मुलांमुळे सुखाची होणार ! वाचा तुमचे आजचे राशी भविष्य

Posted by - January 3, 2023 0
मेष रास : अनेक दिवसांपासून तब्येतीच्या काही कुरबुरी जाणवत आहेत. मोठ्या प्रवास झाल्याने शिन देखील आला आहे. परंतु यासाठी आराम…

तंत्रनिकेतनाच्या उन्हाळी 2022 फेरपरिक्षेचा निकाल जाहीर; फेरपरिक्षेच्या निर्णयामुळे 13 हजार 787 विद्यार्थ्यांना लाभ

Posted by - October 15, 2022 0
मुंबई : मागील दोन वर्ष कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षण सुरु होते. त्यानंतर प्रथमच उन्हाळी 2022 ही परिक्षा प्रचलित पद्धतीने ऑफलाईन…
Jalgaon Suicide

Jalgaon Suicide : मम्मी, पप्पा…सॉरी… अशी चिट्ठी लिहून उच्चशिक्षित तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - June 25, 2023 0
जळगाव : आजकाल तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण खूप वाढले आहे. एका छोट्याशा अपयशामुळे किंवा एखाद्या शुल्लक कारणावरून हे आत्महत्या (Jalgaon Suicide)…

पर्वती जनता वसाहतीमध्ये टोळक्याचा धुडगूस, कोयते नाचवत १२ हुन अधिक वाहनांची तोडफोड

Posted by - June 9, 2022 0
पुणे- स्वारगेटजवळ बुलेट गाडी फोडल्याच्या रागामधून निल्या वाडकर टोळीमधील गुंडांनी पर्वती पायथ्याला असलेल्या जनता वसाहतीमध्ये राडा करत १२ पेक्षा अधिक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *