Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : राजकारण्यांना घाम फोडणारे, लाख मराठ्यांना एकत्र करणारे मनोज जरांगे आहेत तरी कोण?

574 0

जालना : जालन्यामधील आंतरवाली सराटीमध्ये आज म्हणजेच 14 ऑक्टोबर 2023 रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची विराट सभा होणार आहे. या सभेची जोरदार तयारी झाली असून सकाळपासूनच या सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समर्थकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. कितीही गर्दी झाली तरी मराठ्यांनो, आता घरी थांबू नका, कार्यक्रमाला या आणि एकजूट दाखवून द्या, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. या सभेसाठी 5 हजार स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. अगदी रुग्णवाहिकांपासून, पिण्याच्या पाण्यापर्यंत आणि प्रसाधनगृहांपासूनच वाहनतळांपर्यंत सर्व सोयी सभेच्या ठिकाण करण्यात आल्या आहेत. राज्यातील सरकारला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन थेट आव्हान देणारे, लाखो मराठ्यांना आंतरवाली सराटीमध्ये या छोट्याश्या गावात एकत्र करणार मनोज जरांगे पाटील आहेत तरी कोण? याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे मागील 10 ते 15 वर्षांपासून चळवळीच्या माध्यमातून काम करत आहेत. मनोज मूळचे बीडमधील मातोरीचे रहिवाशी आहेत. मात्र मागील काही वर्षांपूर्वी ते जालन्यामधील अंबड तालुक्यामधील अंकुशनगरात वास्तव्यास आहेत. जरांगे यांच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच आहे. मात्र त्यांना तरुण वयापासूनच समाजसेवेची आवड असल्याने सामाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. यासाठीच मनोज जरांगे यांनी अगदी स्वत:च्या मालकीची जमीन विकून मराठा आरक्षण चळवळीला आर्थिक पाठबळ देतानाही पुढचा मागचा विचार केला नाही.

पांढरा पायजमा आणि 3 गुंड्यांचा शर्ट, गळ्यात भगवा आणि छोटीशी वाढलेली दाढी अशाच लूकमध्ये मागील अनेक वर्षांपासून मनोज जरांगे अगदी मंत्रालयापासून ते आंदोलनापर्यंत सगळीकडे दिसत आहेत. मागील एका दशकाहून अधिक काळापासून मनोज जरांगे सातत्याने मराठा आरक्षणाचा पाठपुरावा करत आहेत. जरांगे यांनी या कालावधीमध्ये अनेक मोर्चे काढले, आमरण उपोषणे केली, रास्ता रोको केले, तरुणांना संघटित करुन आपली मागणी लावून धरली. मराठ्यांसाठी लढणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणून मनोज जरांगे यांना संपूर्ण मराठवाड्यात ओळखलं जातं. मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी मनोज जरांगे यांनी स्वत:ला झोकून दिलं आहे. पत्नी, 4 मुलं, 3 भाऊ आणि आई-वडील असा मनोज यांचा परिवार असून त्यांचाही त्यांना पूर्ण पाठिंबा आहे.

Share This News

Related Post

सणासुदीच्या दिवसात एसटी कर्मचाऱ्यांवर येणार आर्थिक संकट ? राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे एसटी महामंडळासमोर मोठे आव्हान

Posted by - September 19, 2022 0
महाराष्ट्र : पुढच्या महिन्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कसा करायचा हा पेचाचा प्रश्न एसटी महामंडळासमोर उभा ठाकला आहे. सरकारकडून एसटी महामंडळास…

राष्ट्रवादी कुणाची; केंद्रीय निवडणूक आयोगात आजच्या सुनावणीत काय झालं

Posted by - October 6, 2023 0
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाव आणि चिन्हासंदर्भातील आजची सुनावणी तब्बल दोन तासांनी संपली आहे. शरद पवार आयोगाच्या कार्यालयातून बाहेर पडले आहेत.…

नागपूर ते पुणे प्रवास आठ तासांत होणार शक्य; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा

Posted by - October 30, 2022 0
नागपूर: सद्यस्थितीत नागपूर ते पुणे हा प्रवास करताना प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी एक…
Gondia News

Gondia News : गोंदिया हादरलं! विद्युत मोटर विहिरीत सोडताना शॉक लागून 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - June 28, 2023 0
गोंदिया : गोंदियामधून (Gondia News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये (Gondia News) विहिरीमध्ये पाण्याची मोटर टाकत…

MAHARASHTRA POLITICS : धनुष्यबाण कोणाचा निर्णय नाहीच ! केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी दरम्यान आज काय घडले ? वाचा सविस्तर

Posted by - January 17, 2023 0
MAHARASHTRA POLITICS : धनुष्यबाण कुणाचा ? यावर आज महत्त्वाचा निर्णय होणार होता. परंतु केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू असलेले ही सुनावणी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *