manoj-jarange-patil

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण आंदोलनाला किती कोटी खर्च झाला? मनोज जरांगेनी भरसभेत हिशोबच मांडला

1396 0

जालना : अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या सभेला मराठा समाजाने विराट गर्दी केलीय. सभेच्या सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या मागण्या काय आहेत हे सांगताना सरकारला फक्त 10 दिवस उरल्याचं म्हणत इशारा दिला. तसंच राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सभेच्या खर्चावरून केलेल्या आरोपावर मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता जोरदार टीका केली. सभेसाठी 7 कोटींचा खर्च झाला म्हणतात पण आम्ही काय एवढ्या पैशाचं वावर घेतलं का? सात कोटी रुपये खर्च झाला म्हणतात, आम्ही काय वावर घेतलं का? 100 एकर विकत घेतलं नाही. सभेसाठी भाड्याने घेतलंय. यातल्या शेतकऱ्यांनी फुकट घेतलंय. येवून विचारा. गाड्या माझ्या मराठ्यांनी स्वत: खर्च करून लावल्या असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

लोक दहा रुपयेही देत नाहीत असा आरोप करतात यावर जरांगे पाटील म्हणाले, तुम्हाला देत नसतील. ज्या गोरगरिब मराठ्यांनी तुम्हाला मोठं केलं. आणि तुम्ही पैसे कमावले, पैसे खाल्ले आणि दोन वर्षे बेसन खाऊन आले आतून. आम्हाला शिकवतात पैसे कुठून आले. माझा मायबाप मराठा काबाडकष्ट करतो, शेतात घाम गाळतो, आम्ही घामातून स्वत: निधी जमा केला.123 गावांनी पैसा गोळा केला. कापूस विकलेले पैसे हजार, पाचशे रुपये देऊन जमा केले. राज्यातून येणाऱ्या बांधवांची सेवा करण्याचं काम केलं. तुमच्यासारखं नाही आमचं असं म्हणत जरांगे पाटील यांनी भुजबळांवर नाव न घेता जोरदार टीका केली.

123 गावातून 22 गावातल्या लोकांनी पैसे दिले ते 21 लाख झाले. इतर 102 गावातल्या लोकांनीही पैसे दिले पण ते घेतले नाही. हे आंदोलन पैशांसाठी नाही तर लोकांसाठी आहे. त्याला वावर घ्यायचं येड लागलंय, आपण सभा घेतली तर त्याला वाटलं आपण वावर विकत घेतली. आम्ही कोटी पहिल्यांदाच ऐकलंय. आपण काय बोलतोय कळलं पाहिजे. उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, तुमच्या पक्षाचे हे जे मंत्री आहेत त्यांना समज द्या. माझ्या नादाला लागले तर मी सोडणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी यावेळी भरसभेत दिला.

Share This News

Related Post

Maratha Reservation

Maratha Reservation : बुलढाण्यात आंदोलक आक्रमक; तरुणाचा इमारतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न

Posted by - September 13, 2023 0
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात राज्यातील पहिला मराठा क्रांती मोर्चा (Maratha Reservation) आयोजित करण्यात आला आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं (Maratha Reservation)…
Samriddhi Highway Accident

Samruddhi Highway : मोठी बातमी! समृद्धी महामार्ग अपघाताप्रकरणी दोन RTO अधिकाऱ्यांना अटक

Posted by - October 16, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : रविवारी समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये बारा जणांचा मृत्यू झाला तर तेवीस…

Maharashtra Rain Update : पुण्यासह महाराष्ट्रात गुरुवारपर्यंत तुफान कोसळणार पाऊस;महाराष्ट्रात ‘रेड अलर्ट’ जारी

Posted by - July 12, 2022 0
पुणे : मुंबई,पुणेसह संपूर्ण महाराष्ट्रात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसण्याची दाट शक्यता वर्तवण्यात…
Chhagan Bhujbal Threat

Chhagan Bhujbal Threat : भुजबळांना धमकी देणाऱ्याला पुण्यातून अटक

Posted by - July 11, 2023 0
पुणे : युती सरकारमधील कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ यांना (Chhagan Bhujbal Threat) एका अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. आरोपीने…

पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे अपूर्ण काम लवकरच पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

Posted by - March 16, 2023 0
मुंबई : पुणे जिल्ह्यातील अपूर्ण राहिलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम (पीएन 25) लवकरच पूर्ण करण्यात येईल. पावसाळ्यापूर्वी 1200 मीटर रस्त्याचे, तर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *