Manoj Jarange Patil

Manoj Jarange : “मी जर यांचे तीन अध्यादेश परत पाठवू शकतो, तर…”, मनोज जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका

443 0

जालना : गेल्या 15 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे. राज्य सरकारकडून वारंवार मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत राज्य सरकारने महत्त्वाचा ठराव पारित केला आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील उपोषण मागे घेणार असल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, जोपर्यंत हातात प्रमाणपत्र पडत नाही, तोपर्यंत मी हटणार नाही, अशी ठाम भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली आहे.

“संभ्रम निर्माण करू नका”
“आम्ही उपोषण मागे घेतलेलं नाही. आरक्षण मिळेपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. आंदोलन थांबणार नाही. फक्त त्यांच्या ठरावात काय आहे हे बघण्यासाठी आम्ही दुपारी बैठक घेत आहोत. महाराष्ट्रातल्या मराठा समाजात संभ्रम निर्माण करण्याचं कारण नाही. आपलं सगळं समाजासमोर पारदर्शी आहे”, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.

“त्यांच्या ठरावावर मी ऐकणार आहे का?”
“काल त्यांनी काय चर्चा केली ते मला बघायचं आहे. स्वातंत्र्यापासून एकतर सगळे पक्ष या मुद्द्यावर एकत्र येत नव्हते. आता आलेत तर आपणही थोडं सकारात्मक बोललं पाहिजे. विरोध करताना दणकून विरोध केला आपण. बघुयात त्यांचा काय ठराव आहे. मी जर त्यांचे तीन जीआर परत पाठवू शकतो, तर मग ठरावावर मी ऐकणार आहे का? आता महाराष्ट्रातला मराठा हुशार आहे. पक्कं काही बघितल्याशिवाय माघारी जात नाही आता”, असा निर्धार जरांगे पाटील यांनी यावेळी बोलून दाखवला.

Share This News

Related Post

Milind Narvekar

Milind Narvekar : मिलिंद नार्वेकरांना शिंदेंनी दिली उमेदवारीची ऑफर?

Posted by - April 21, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती उद्धव ठाकरेंना अजून एक जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहे. उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव आणि…
Kolhapur News

Kolhapur News : खाणीत बुडणाऱ्या पोटच्या गोळ्याला वाचवताना आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - September 18, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव पैकी मुकनावर वसाहतीजवळ एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये…
Chhatrapati Sambhaji Nagar

Chhatrapati Sambhaji Nagar : आईची भेट राहिली अधुरी ! आजारी आईला भेटण्याआधीच तरुणाने घेतला जगाचा निरोप

Posted by - September 9, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhaji Nagar) एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आई आजारी असल्यामुळे…

मुख्यमंत्र्यांचे ठरले ! येत्या ९ एप्रिलला रामल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार

Posted by - April 3, 2023 0
एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याचा कार्यक्रम ठरला असून, ९ एप्रिल रोजी एकनाथ शिंदे अयोध्येत जाऊन रामलल्लांचं दर्शन घेणार आहेत. मागील…
Pune News

Pune News : धरणाच्या पाण्याचा अंदाज चुकला अन्; पुण्यातील बापलेकीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 16, 2023 0
पुणे : पुण्यातील (Pune News) भोर तालुक्यातील जयतपाड या ठिकाणी असणाऱ्या भाटघर धरणाच्या (Pune News) बॅकवॉटरमध्ये बुडून बापलेकीचा दुर्दैवी मृत्यू…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *