Manoj Jarange Patil

Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी सरकारला अल्टिमेटम देत उपोषण घेतले मागे

1842 0

जालना : सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी दाखल झाले आहे. भाजप, राष्ट्रवादी, सेनेचे कॅबिनेट मंत्री, कायदेतज्ज्ञ आणि आरोग्य सेवक अशा 6 जणांचा समावेश आहे. मराठ्यांना कुणबी दाखले देण्याबाबत न्यायमूर्तींचं शिष्टमंमडळ आणि जरागेंमध्ये चर्चा झाली. जरांगेची मनधरणी करण्यात सरकार यशस्वी झाल्याचे पाहायला मिळत आहे. या शिष्टमंडळात संदीपान भुमरे, अतुल सावे, उदय सामंत, धनंजय मुंडे, नारायण कुचे, बच्चू कडू यांचा समावेश आहे. गायकवाड समितीचे अध्यक्ष एम जी गायकवाड आणि माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे हे दोन न्यायमूर्तीही जरांगेंच्या भेटीसाठी आले. यावेळी मनोज जरांगे यांनी सरकारला अल्टिमेटम देत उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली.

जरांगे आणि शिष्टमंडळात काय झाली चर्चा ?
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला वेळ वाढवून दिला आहे.
वेळ घ्या पण आरक्षण द्या मनोज जरांगे यांची भूमिका – मनोज जरांगे
सरकारच्या शिष्टमंमडळसोबत यशस्वी चर्चा
आता दिलेली वेळी ही शेवटची असणार आहे – मनोज जरांगे
सर्वांची दिवाळी गोड झाली पाहिजे
सरसकट मराठा आरक्षण द्यायला सरकार तयार
7 डिसेंबरला अधिवेशन आणि 8 तारखेला सर्वपक्षीय ठराव ठेवणार – धनंजय मुंडे
8 डिसेंबरला मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय चर्चा करणार – धनंजय मुंडे
आरक्षण नाही दिले तर मुंबईत जाऊन बसणार मनोज जरांगेची पुढची भूमिका
मनोज जरांगे यांनी सरकारला अल्टिमेटम देत उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली

काय म्हणाले जरांगे पाटील?
‘सरकारला ही शेवटची वेळ. सर्वांची दिवाळी गोड झाली पाहिजे. सरकारला वेळ द्यायला तयार आहे. सरकारला वेळ घ्यायचा असेल तर घ्या, पण आरक्षण द्या. हे आरक्षण सरसकटच हवं. थोडासा वेळ वाढवून देऊ’, असं जरांगे पाटील म्हणाले. सरकारला वेळ देण्यात काहीच गैर नाही, असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं. शिष्टमंडळाने 2 जानेवारीपर्यंतची वेळ मागितली, पण जरांगे पाटील यांनी आपण 24 डिसेंबरपर्यंतचाच वेळ देऊ शकतो, असं सांगितलं. पण शिष्टमंडळाने विनंती केल्यानंतर जरांगे पाटील 2 जानेवारीपर्यंतचा वेळ द्यायला तयार झाले. सरकारला दिलेली ही शेवटची वेळ असून काही दगाफटका केला तर मुंबईच्या नाड्या आवळू असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

Share This News

Related Post

#EKANATH SHINDE : “बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय आहे…!” निवडणूक आयोगाच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया !

Posted by - February 17, 2023 0
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पदरात पडले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात गेल्या अनेक…
Mumbai Pune Expressway Accident

Mumbai Pune Expressway Accident : मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर काचांच्या ट्रकचा भीषण अपघात; वाहतूक विस्कळीत

Posted by - August 3, 2023 0
मुंबई : राज्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर पुन्हा एकदा भीषण अपघात (Mumbai Pune Expressway Accident) झाला…
Khodala

धक्कादायक ! सर्पदंशामुळे 7 वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 19, 2023 0
जव्हार : मोखाडा तालुक्यातील सायदे ग्रामपंचायतीमधील (Sayde Gram Panchayat) बोरीची वाडी (Borichi Wadi) या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे.…

Gujarat Assembly Elections : गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत महत्त्वाची घोषणा, ‘या’ दिवशी निवडणून, वाचा सविस्तर

Posted by - November 3, 2022 0
गुजरात : 1 आणि 5 डिसेंबरला गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. तर 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे 25 वर्ष…

रशियावरील बंदीचा भारतावर परिणाम… ?

Posted by - March 7, 2022 0
युक्रेनवरील हल्ल्यानंतर जगभरातून रशियावर टीका होत आहे.अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांनी रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. निर्बंधांमुळे भारत आणि रशिया यांच्यातील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *