Manisha Kayande

Manisha kayande : शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच मनिषा कायंदेकडे सोपवण्यात आली ‘ही’ जबाबदारी

482 0

मुंबई : आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. पण वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी (Manisha kayande) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.शिवसेनेच्या पूर्वसंध्येला शिशिर शिंदे (Shishir Shinde) आणि आमदार मनिषा कायंदे (Manisha kayande) यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केल्यामुळे हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Ashish Deshmukh : आशिष देशमुखांनी भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांच्यावर सोपवण्यात आली ‘ही’ मोठी जबाबदारी

काय म्हणाल्या मनिषा कायंदे?
यावेळी मनिषा कायंदे मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, गेल्या एक वर्षात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून जो कामाचा झपाटा लावला आहे.त्यामुळे आज मी ओरिजिनल शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्ष सोडून जाणाऱ्यांवर फक्त दोषारोप करणे पण लोक का पक्ष सोडून जात आहेत याचे आत्मपरीक्षण न करणे अशी अनेक कारणे आहेत म्हणत त्यांनी ठाकरे गटावर टीका केली.

मनिषा कायंदेंवर एकनाथ शिंदेंनी सोपवली ‘ही’ महत्वाची जबाबदारी
एकनाथ शिंदे यांनी मनिषा कायंदे यांचे पक्षात स्वागत करत त्यांना भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांची शिवसेना पक्षाच्या सचिव आणि प्रवक्तेपदी निवड केली आहे. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदा एखाद्या महिलेवर सचिव पदाची जबाबदारी सोपवली आहे. महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायंदे यांनी जास्तीत जास्त पुढाकार घ्यावा असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या आधीच ठाकरे गटाला मोठा धक्का; शिशिर शिंदे यांचा राजीनामा

मनिषा कायंदे यांची कारकीर्द
लहानपणापासून संघाचे संस्कार झालेल्या कायंदे (Manisha kayande) यांना घरातूनच समाजसेवा आणि राजकारणाचं बाळकडू मिळालेलं आहे. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला भाजपमधून सुरुवात केली आहे. लहानपणी त्या वडिलांसोबत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भाषणे ऐकायला जायच्या. त्यांचे वडिलांची ग्रामीण भागात नेत्रं शिबिरे भरवायचे. त्यामध्ये त्या आपल्या वडिलांना मदत करत होत्या. तब्बल 25 ते 30 वर्षे त्यांनी (Manisha Kaynade) भाजपमध्ये काम केलं. 2012 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2014 मध्ये त्यांना शिवसेनेकडून त्यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली. नंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना विधानपरिषदेचे तिकीट दिले. विधान परिषदेवर जाणं हा आपल्या राजकीय प्रवासातील मोठा टर्निंग पॉइंट ठरला होता.

Share This News

Related Post

Sanjay Kakde

Sanjay Kakde : माजी खासदार संजय काकडे यांच्या अडचणीत वाढ! कर्ज बुडविल्याप्रकरणी कोर्टाकडून कंपनीचे शेअर्स विकण्याचे आदेश

Posted by - June 29, 2023 0
पुणे : भाजपचे माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakde) यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. विस्ट्रा आयटीसीएल लिमिटेड कंपनीचे कर्ज…

संजय राऊत म्हणाले, ‘या सहा आमदारांनी दगाफटका केला’, राऊतांनी जाहीर केली नावे

Posted by - June 11, 2022 0
मुंबई- नाट्यमय घडामोडीनंतर राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी झालेल्या प्रतिष्ठेच्या लढतीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला. या…

महापालिकेत आजपासून ‘प्रशासकराज ‘ नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात

Posted by - March 15, 2022 0
पुणे महानगरपालिकेचा कालावधी काल (ता.14 मार्च) रोजी संपली असून आता महापालिकेत प्रशासक राजवट असणार  आहे. नगरसेवकांचा पाच वर्षाचा कालावधी संपल्याने…

फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांचा कुलाबा पोलीस ठाण्यात जबाब

Posted by - March 23, 2022 0
मुंबई- फोन टॅपिंग प्रकरणी पुण्याचे माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला मुंबईच्या कुलाबा पोलिस स्टेशन मध्ये दुसर्‍यांदा जबाब नोंदवण्यासाठी हजर झाल्या…

गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ ; पहिल्याच दिवशी तब्बल ‘इतक्या’ कोटींची कमाई

Posted by - February 27, 2022 0
अभिनेत्री आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाकडून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *