Majhi Kanya Bhagyashree Yojana

Majhi Kanya Bhagyashree Yojana : लेक जन्माला येताच ‘या’ योजनेद्वारे होणार लखपती

3078 0

मुंबई : केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून मुलींसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजनांतर्गत मुलींच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंतचा खर्च समाविष्ट केला जातो. अशीच एक योजना महाराष्ट्र शासन राबवत आहे. ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ (Majhi Kanya Bhagyashree Yojana) असं या योजनेचं नाव आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार मुलींच्या जन्मानंतर 50,000 रुपये देते. माझी कन्या भाग्यश्री योजना एप्रिल 2016 रोजी महाराष्ट्र शासनाकडून सुरु करण्यात आली होती.

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ कसा घ्याल?
माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत आई आणि मुलीच्या नावाने बँकेत संयुक्त खाते उघडले जाते. यावर 1 लाख रुपयांचा अपघात विमा आणि 5000 रुपयांचा ओव्हरड्राफ्ट उपलब्ध आहे. याशिवाय, मुलीच्या जन्मानंतर पालकांना नसबंदी करून घ्यायची असेल तर त्यांना 50 हजार रुपये मिळतात. त्याचबरोबर दोन मुलींच्या जन्मानंतर नसबंदी केली तर दोन्ही मुलींच्या नावावर 25-25 हजार रुपये दिले जातात. माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत मिळालेले पैसे मुलीच्या शिक्षणासाठी वापरण्यात येतात.

या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे. यासोबतच आई किंवा मुलीचे बँक खाते पासबुक, मोबाईल फोन नंबर. पासपोर्ट आकाराचा फोटो, रहिवासी पत्ता पुरावा असावा. यासोबतच उत्पन्नाचा दाखलाही आवश्यक आहे. तिसरे अपत्य असले तरी, या योजनेंतर्गत फक्त दोन मुलींच्या नावाने लाभ घेता येतो.

या योजनेसाठी कसा कराल अर्ज?
या योजनेसाठी अर्ज करणे खूप सोपं आहे. माझी कन्या भाग्यश्री योजनेत नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर फॉर्म डाउनलोड करावा लागेल. तो काळजीपूर्वक वाचून भरावा लागेल. जर काही चूक झाली तर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्रे महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडे जमा करावी लागतील.

या योजनेतील नियम आणि अटी
1) मुलीचे आईवडिल महाराष्ट्रातील रहिवाशी असावेत.
2) योजना सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील तसेच दारिद्र रेषेवरील एपीएल पांढरे रेशन कार्डधारक दोन मुलींना लागू असेल.
3) विम्याचा लाभ घेताना मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण आवश्यक आहे. तसेच दहावी उत्तीर्ण होणे व 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत अविवाहित आवश्यक
4) या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना मुलगी जन्म नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
5) दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जर जुळ्या मुली झाल्या, तर या दोन्ही मुली प्रकार दोनचे लाभार्थी प्रमाणे योजनेस पात्र असतील.
6) बालगृहातील अनाथ मुलींसाठी योजना लागू आहे
7) एखाद्या परिवाराने अनाथ मुली दत्तक घेतली असेल, तर सदर मुलीला त्यांची प्रथम मुलगी मानून या योजनेचा लाभ घेता येईल.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maratha Reservation : मराठा आरक्षण विषयी छत्रपती संभाजीराजे यांनी दिल्लीत बोलावली सर्व खासदारांची बैठक

Pune News : पुण्यात ATS ची मोठी कारवाई ! बेकायदा वास्तव करणाऱ्या 8 बांगलादेशी नागरिकांना अटक

Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका; रात्री उशिरा रुग्णालयात दाखल

Share This News

Related Post

Eknath Shinde

Maratha Reservation : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीच्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपुर्द

Posted by - February 16, 2024 0
मुंबई : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी आज मराठा समाजाचे (Maratha Reservation) मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात…

मोठी बातमी! राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं निलंबन

Posted by - December 22, 2022 0
नागपूर: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं निलंबन करण्यात आलं असून नागपूर अधिवेशनापर्यंत जयंत पाटील निलंबित करण्यात आलं आहे. अध्यक्षांबाबत अपशब्द…

लोकसंख्येच्या बाबतीत भारतानं चीनलाही टाकलं मागे; तब्बल इतक्या लोकसंख्येसह भारत बनला सर्वाधिक लोकसंख्येचा देश

Posted by - April 19, 2023 0
भारताने चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, भारत 142.86 दशलक्ष लोकसंख्येसह जगातील सर्वात…

पुणे : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन

Posted by - January 11, 2023 0
पुणे : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते परिवहन अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताह २०२३ चे उद्घाटन करुन मोटारसायकल…

सिल्वर ओकवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड कोण, याचा पोलीस शोध घेणार- अजित पवार

Posted by - April 9, 2022 0
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष  शरद पवार यांच्या मुंबईमधील घरावर संपकरी एसटी कामगारांनी प्रचंड गोंधळ घातला. या कामगारांनी चप्पलफेक देखील केली.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *