Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update: महाराष्ट्र गारठणार ! ‘या’ तारखेपर्यंत राज्यात असणार थंडीचा मुक्काम

596 0

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील वातावरणात (Maharashtra Weather Update) गारवा पसरलेला आहे. पुढील आठवड्यापर्यंत अशीच परिस्थिती राहणार असल्याचा दावा हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. 1 फेब्रुवारीपर्यंत राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तापमान कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. डोंगराळ भागात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळं उत्तर भारतात गारठा वाढला आहे.

हवामान विभागाने काय दिला इशारा?
1 फेब्रुवारीपर्यंत राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार आहे. खासकरुन मुंबईसह कोकणात सरासरीइतकी थंडी जाणवेल तर उर्वरीत महाराष्ट्रात थंडीचा कडाका जास्त असेल. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान 10 अंशाच्या खाली राहू शकतं. त्याचवेळी उर्वरीत महाराष्ट्रात किमान तापमान 12 अंशापर्यंत राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पहाटेच्या किमान तापमाना बरोबर दिवसाच्या कमाल तापमानाचाही सरासरीपेक्षा घसरलेला पारा यामुळेच धुके पडत आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. आणखी काही दिवस हे धुके टिकून राहणार असल्याची माहितीदेखील देण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Blood Donation : सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या वतीने खराडीत विक्रमी 3671 जणांचे रक्तदान

Nitish Kumar : बिहारच्या राजकारणात ‘खेला खोबे’! नितीशकुमार यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

Share This News

Related Post

रियल इस्टेट एजंट म्हणून काम करण्याचा विचार करताय ? यापुढे महारेराची परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल, ही बातमी वाचाच

Posted by - January 14, 2023 0
महाराष्ट्र : रियल इस्टेट एजंटसच्या कार्यपद्धतींमध्ये विशिष्ट स्तरावर सुसंगता आणण्यासाठी नियमक आणि कायदेशीर फ्रेमवर्क आणि पद्धतींचे ज्ञान आणि जागरूकता वाढवण्यासाठी…
Shreyanka Patil

Shreyanka Patil : श्रेयंका पाटीलने रचला इतिहास, WCPL मध्ये खेळणारी ठरली पहिली भारतीय

Posted by - July 1, 2023 0
मुंबई : वूमन्स एमर्जिंग अंडर 23 आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या श्रेयांका पाटीलने (Shreyanka Patil) आपल्या खेळीने सगळ्यांनाच प्रभावित केले होते.…

सावित्रीबाई फुले यांची प्रतिकात्मक स्वरूपाची शाळा(व्हिडीओ)

Posted by - March 10, 2022 0
‘खामोशी से जब भर जाओगे, तभी थोडा चीख लेना, वरना मर जाओगे!’ स्त्रीमनातील काळानुकाळ झालेली घुसमट दूर करून त्यांना व्यक्त…
Kolhapur News

Kolhapur News : दारूची नशा डोक्यात गेल्याने पोलिसाचा ‘गुंड’ झाला; कोल्हापूरच्या हॉटेलमधील धक्कादायक Video आला समोर

Posted by - March 14, 2024 0
कोल्हापूर : कोल्हापूरमधून (Kolhapur News) खाकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या एका पोलिसाने हॉटेलमध्ये संतापजनक कृत्य केलं आहे.…
punit balan

Pune Loksabha : युवा उद्योजक पुनीत बालन यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

Posted by - May 13, 2024 0
पुणे : पहिल्या तीन टप्प्यांनंतर आज देशभरात चौथ्या टप्यातील मतदान (Lok Sabha) पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघातील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *