Maharashtra Weather

Maharashtra Weather Alert : राज्यात पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

427 0

हवामान विभागाच्या (Maharashtra Weather Alert) पुणे वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार सध्या वातावरणाच्या खालच्या थरात असणारी द्रोणिकारेषा तामिळनाडूच्या दक्षिणेुपासून मध्य प्रदेशापर्यंत जात आहे. पुढं हीच रेषा विदर्भातूनही जात असल्यामुळं राज्यातील हवामान कोरडं राहणार आहे. तर, हवेच्या या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं काही भागांमध्ये ढगाळ वातावरण दिसणार आहे.

हवामानातील या बदलांमुळं सध्या अवकाळीला पोषक वातावरण तयार होत असून, धुळे, नंदुरबारसह मध्य महाराष्ट्रात पुढील 24 तासांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढं 6 ते 8 एप्रिलदरम्यान मराठवाड्यात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडणार आहे. पण हा पाऊस मध्यम स्वरुपाचा असणार आहे.

आठवड्याअखेरीस राज्यातील नाशिक, जालना, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबादमध्ये विजांच्या कडकडाटात पावसाची हजेरी असेल. तर, पुढच्या 48 तासांमध्ये पुण्यासह नजीकच्या भागांमध्ये आकाश निरभ्र राहणार असून, निवडक भागांवर ढगांचं सावट पाहायला मिळणार आहे. पुढच्या 24 तासांमध्ये या भागांसह यवतमाळ, नागपूरमध्ये उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मालेगाव, सोलापुरमध्ये असेच चित्र पहायला मिळणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

RBI : निवडणुकीच्या तोंडावर RBI ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Siddhasana : सिद्धासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Congress

Lok Sabha Election : काँग्रेसकडून लोकसभेसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर

Posted by - March 24, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. या यादीत 46 उमेदवारांची…
Nanded Crime

धक्कादायक! चुकीचे इंजेक्शन दिल्याने तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 22, 2023 0
नांदेड : नांदेडमध्ये (Nanded) एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे.…

उन्हाळ्यात कशा प्रकारे घ्यावी स्वतःच्या आरोग्याची काळजी, जाणून घ्या..

Posted by - March 7, 2022 0
उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे रक्तदाबाचा त्रास, चक्कर येणे, डोके दुखणे, थकवा जाणवणं, पायात गोळा येणे, चिडचिड व राग…
Mantralaya

Cursed Hall : मंत्रालयातील ‘602’ नंबरचं दालन ‘शापित’ म्हणून ओळखले जाते काय आहे त्यामागचा इतिहास ?

Posted by - July 7, 2023 0
मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांना अखेर 6 व्या मजल्यावरील अतिरिक्त प्रधान सचिवांचे दालन…
Crime

Chhatrapati Sambhajinagar Crime : छ. संभाजीनगर हादरलं ! धक्का लागला म्हणून तरुणावर प्राणघातक हल्ला

Posted by - November 9, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar Crime) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये दुचाकीचा धक्का लागल्याच्या शुल्लक कारणातून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *