Maharashtra Rain

Maharashtra Rain : पुढील 48 तासांत ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

1573 0

मुंबई : सप्टेंबर महिन्याची सुरुवात मुसळधार पावसानं (Maharashtra Rain) झाली. गणेशोत्सवामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. पावसाच्या आगमनाने आपला शेतकरीदेखील सुखावला आहे. हा पाऊस सध्या देशाच्या काही राज्यांमधून परतीची वाट धरताना दिसत आहे. असं असलं तरीही महाराष्ट्रात त्याचा मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागानंच राज्यातील परतीच्या पावसाची तारीख वाढल्याचे स्पष्ट केले आहे.

1 ऑक्टोबरपर्यंत राज्याच्या काही भागांमध्ये मध्यम तर, काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, त्यानंतर पुढील दोन दिवसांसाठी भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग, गडचिरोली, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळेल. राज्याच्या उर्वरित भागांमध्ये मात्र पाऊस उघडीप देईल असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

तसेच मुंबईसह उपनगरांमधील काही भागांत पावसाच्या तुरळक सरींची अधूनमधून बरसात होईल. तर, अधूनमधून विजांच्या कडकडाटामुळं सोसाट्याचा वारा आणि ढगांचा गडगडाट असे चित्र शहरातील काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. पुढच्या किमान दहा दिवसांसाठी शहरात आणि शहराला लागून असणाऱ्या उपनगरीय क्षेत्रांमध्ये अशीच परिस्थिती पाहायला मिळणार आहे.

Share This News

Related Post

अहमदनगरमध्ये 12 तास अडकलेली निजामुद्दीन एक्स्प्रेस खा. सुप्रिया सुळेंच्या प्रयत्नामुळे सकाळी पुण्यात; प्रवाशांनी मानले सुप्रियाताईंचे आभार

Posted by - October 19, 2022 0
पुणे : दिल्लीहून निघालेली हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस अहमदनगर रेल्वे स्थानकावर काल तब्बल बारा तास थांबवण्यात आली होती. त्यानंतरही थेट पुण्याकडे…

#PUNE : कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करावी; भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचे सर्व पक्षांना आवाहन

Posted by - January 31, 2023 0
पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन शहर भाजपच्या वतीने अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय…
Ajit Pawar

Ajit Pawar : “अजित पवारांना भाजपा कधीही मुख्यमंत्री करणार नाही”, ठाकरे गटाच्या नेत्याचे मोठे विधान

Posted by - December 12, 2023 0
नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी…

पानशेत धरण 100% भरलं; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Posted by - August 11, 2022 0
पुणे: पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात सुरू असलेला मुसळधार पाऊस गुरुवारी सकाळपर्यंत कायम होता. त्यामुळे पानशेत धरण १००…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *