Sharad Pawar

Ajit Pawar : अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांकडे किती आमदार शिल्लक ? पहिला आकडा आला समोर

559 0

मुंबई : काल महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही आमदारांसह बंड केल्याने राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली. काल पार पडलेल्या शपथविधीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, धर्मराव अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील यांनीदेखील मंत्री पदाची शपथ घेतली आहे. या शपथविधीनंतर पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे, असा दावा अजित पवारांनी केला आहे. एवढच नाही तर अजित पवारांनी पुढच्या निवडणुका भाजप-शिवसेनेसोबत राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढू हेदेखील अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

एकीकडे हे सगळे सुरु असताना दुसरीकडे सात आमदारांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. या आमदारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेमध्ये एकूण 53 आमदार आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, अनिल देशमुख, संदीप क्षीरसागर, प्राजक्त तनपुरे आणि बाळासाहेब पाटील यांनी आतापर्यंत शरद पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे.

Maharashta Politics : ‘या’ 6 काका-पुतण्यांच्या जोड्या ज्यांनी दिलं महाराष्टाच्या राजकारणाला नवे वळण

Praful Patel : प्रफुल पटेलांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी ?

या 7 आमदारांपैकी 6 जणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शरद पवारांसोबत असल्याचं स्पष्ट केलं. तर बाळासाहेब पाटील यांनी मीडियासमोर येऊन शरद पवारांसोबत असल्याचे जाहीर केले होते. अजित पवारांच्या शपथविधीनंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली, तेव्हा रोहित पवार हे शरद पवारांच्या बाजूला होते.

Share This News

Related Post

चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणी देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना ‘हे’ महत्वाचे आदेश

Posted by - December 13, 2022 0
पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शाई फेक केली होती. या प्रकरणानंतर…

Loksabha Elections : राज्यात ड्राय डेची घोषणा; ‘ या’ दिवशी बंद असणार मद्यविक्री

Posted by - May 17, 2024 0
पुणे : राज्य शासनाकडून तीन दिवस राज्यात मद्यविक्रीला बंदी घालण्यात आली आहे. या आठवड्यात शनिवारपासून ते पुढील आठवड्यातील सोमवारपर्यंत राज्यात…
Parth Pawar

Parth Pawar : पार्थ पवारांनी घेतली गुंड गजा मारणेची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Posted by - January 25, 2024 0
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी पुण्यात कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेतल्याने राजकीय…
Upendra Dwivedi

Upendra Dwivedi : देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती

Posted by - June 12, 2024 0
मुंबई : देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी (Upendra Dwivedi) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. विद्यमान लष्करप्रमुख…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *