Ajit Pawar

Ajit Pawar : महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून मदत; अजित पवारांची विधिमंडळात घोषणा

721 0

मुंबई : महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे वेगवेगळ्या भागांमध्ये पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्या नुकसानाबद्दल उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधान परिषदेमध्ये मदतीची घोषणा केली आहे. सरकार सगळ्यांना मदत करणार असल्याचे आश्वासन अजित पवारांनी (Ajit Pawar) यावेळी दिले. या घोषणेनुसार पुरग्रस्तांना तातडीची 10 हजारांची मदत करण्यात येणार आहे. तसेच दुकानांचं नुकसान झालं असेल तर 50 हजार रुपये आणि टपरीचं नुकसान झालं असेल तर 10 हजार रुपये देणार असल्याचे अजित पवार यांनी यावेळी जाहीर केले आहे.

याबरोबर पुरामुळे नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य देण्यात येणार आहे, तसंच दुबार पेरणीकरता बियाणंही उपलब्ध होतील, शेतकरी अडचणीत येणार नाही. शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करणार आहोत, अशी ग्वाही अजित पवारांनी यावेळी विधिमंडळात दिली. तसंच आपण एनडीआरएफ पेक्षा जास्त मदत केली आहे. पुरामुळे गावातले रस्ते खराब झाले असतील तर बांधकाम विभाग रस्ते दुरूस्त करतील, असंदेखील अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.

‘चंद्रपुरात मोठं नुकसान झालं आहे, मुख्यमंत्री आणि मंत्री घटनास्थळी गेल्यानंतर कामाला वेग आलेला पाहायला मिळाला. सर्व जिल्हाधकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेण्यात येईल. त्यानंतर आवश्यकतेनुसार आदेश दिले जातील, सरकार कुणालाही निधीची कमतरता भासू देणार नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने एनडीआरएफच्या मदतीपेक्षा जास्त मदत दिली आहे. सरकार सर्वांना मदत करेल,’ असे अजित पवार (Ajit Pawar) विधान परिषदेमध्ये म्हणाले आहेत.

Share This News

Related Post

Ramdas Kadam

Ramdas Kadam : ‘उद्धव ठाकरेंना कानफाटीत…’; रामदास कदम यांचे मोठे विधान

Posted by - March 15, 2024 0
मुंबई : महायुतीमधील जागा वाटपासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीचा दौरा करणार असून लवकरच महायुतीच्या सर्व जागांचं…
Sangli News

Sangli News : धक्कादायक ! सांगलीमध्ये 2 मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत

Posted by - September 15, 2023 0
सांगली : सांगलीमध्ये (Sangli News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मिरजेच्या कृष्णात धुणे धुण्यासाठी पाच परप्रांतीय तरुण गेले…
PSLVC-56

ISRO : चांद्रयान-3 नंतर इस्रोचं नवं मिशन! PSLV-C56 चं 30 जुलै रोजी होणार प्रक्षेपण

Posted by - July 27, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चांद्रयान-3 (Chandrayaan-3) च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रो (ISRO) आता एका नवीन मोहीमेसाठी सज्ज झाले आहे. भारतीय…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आता व्यंगचित्र कला संग्रहालयही..!

Posted by - March 12, 2022 0
भारतातील प्रसिद्ध व्यंगचित्रकारांनी काढलेल्या चित्राबरोबरच भारतात इस्ट इंडिया कंपनीची सुरवात आणि त्यानंतरच्या ब्रिटिश राजवटीपासून ते आतापर्यंत एकूणच सामाजिक राजकीय घडामोडींवर…

मध्य प्रदेश बस दुर्घटना : बचावलेल्या प्रवासी आणि जखमींना तातडीने मदत पोहोचवा ; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

Posted by - July 18, 2022 0
मुंबई : मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *