ST Bus

Maharashtra DA News : खुशखबर ! एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ

427 0

मुंबई : गणेशोत्सवाच्या आधी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिेदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता (Maharashtra DA News) वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्के करण्यात येणार आहे. सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येते. त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर 9 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.

एसटी महामंडळाच्या अमृत महोत्सवाच्या सांगता समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे महागाई भत्ता दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, या आश्वासनावर कार्यवाही होत नसल्याने एसटी कर्मचारी संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या प्रस्तावाची फाईल मंत्रालयात धूळ खात पडली असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी एसटी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला होता.

Share This News

Related Post

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होण्याची शक्यता?

Posted by - August 8, 2022 0
मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर उद्या सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती समोर आली…
Government

Jalna Lathi Charge : जालना लाठीचार्जवर देवेंद्र फडणवीस यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - September 4, 2023 0
जालना : जालन्यातील लाठीमाराच्या (Jalna Lathi Charge) घटनेवरून राज्यात जोरदार पडसाद उमटलेले आहेत. आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. त्यामुळे मराठा समाजात…
Mahavikas Aghadi

Mahavikas Aghadi : उद्धव ठाकरेंच्या घोषणांमुळे मविआमध्ये धुसफूस; आंबेडकरांच्या ‘त्या’ पत्राने वाढवलं टेन्शन

Posted by - March 13, 2024 0
मुंबई : महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) लोकसभा जागा वाटप अद्याप जाहीर झालं नाही. काही जागांवरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जोरदार…

वसंत मोरे यांचे समर्थक माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष निलेश माझिरे यांचा मनसेला रामराम ?

Posted by - May 20, 2022 0
पुणे – मागील काही दिवसांपासून पुणे मनसेमध्ये अंतर्गत कुरबुरी, तक्रारी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुणे मनसेला आणखी एक…
Nashik News

Nashik News: पोलिसांच्या हातातून फरार झालेल्या ‘त्या’ आरोपीचा सापडला मृतदेह

Posted by - October 3, 2023 0
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील (Nashik News) पिंपळनारे येथील युवकाने लग्नाचे आमिष दाखवत युवतीवर अत्याचार केल्याच्या आरोपात पोलिसांच्या ताब्यात असलेला संशयित…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *