Nana Patole

Leader of the Opposition : ‘या’ कारणामुळे विरोधीपक्ष नेत्याच्या निवडीला विलंब; नाना पटोलेंनी दिली प्रतिक्रिया

780 0

नागपूर : राज्यात पावसाळी अधिवेशनला सुरू होऊन जवळपास एक आठवडा उलटला आहे. तरीदेखील अजूनपर्यंत विरोधी पक्षनेत्याची निवड (Leader of the Opposition) करण्यात आलेली नाही. विधानसभेचे विरोधी पक्षनेते (Leader of the Opposition) अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झाले होते, तेव्हापासून हे पद रिक्तच आहे. अजित पवार यांनी आपल्या काही समर्थक आमदारांसह बंड केल्याने राष्ट्रवादीचे संख्याबळ कमी झाले. त्यामुळे आता या पदावर काँग्रेसकडून दावा करण्यात आला आहे. मात्र विरोधी पक्षनेता निवडीला विलंब होत असल्यामुळे राज्यात चर्चाना उधाण आले आहे. या सगळ्यांवर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Ahmadnagar News : धक्कादायक! अहमदनगरमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त; एकाला अटक

काय म्हणाले नाना पटोले?
काँग्रेस महत्त्वाच्या विरोधी पक्षाच्या (Leader of the Opposition) भूमिकेत सभागृहात काम करत आहे. दोन्ही सभागृहात आता आमचाच विरोधी पक्षनेता होऊ शकतो. विरोधी पक्षनेत्याच्या बाबतीमध्ये आमच्या हायकमांडने सहकारी पक्षाला विचारून निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याच्या निवडीला वेळ लागत आहे. या आठवड्यात यावर नक्की निर्णय होईल असे नाना पटोले म्हणाले आहेत.

Share This News

Related Post

दुर्दैवी : मुसळधार पावसामुळे पुण्यात झाड पडून एका रिक्षा चालकाचा मृत्यू

Posted by - September 30, 2022 0
पुणे : चार वाजता सुमारास पुण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. विजेच्या कडकडाटात जोरदार पाऊस पडल्यामुळे पुण्यातील विविध भागांमध्ये झाडपडीचा घटना…

वारंवार वाहतूक नियम मोडणाऱ्यांचा वाहन परवाना निलंबित करावा – उपमुख्यमंत्री

Posted by - October 17, 2022 0
मुंबई : राज्यात रस्त्यांवर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे घोषीत करण्यात आलेले ब्लॅक स्पॉट संबंधित विभागांनी तातडीने दूर करावेत, असे निर्देश देतानाच…
Ajit Pawar

Ajit Pawar : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप; अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?

Posted by - July 2, 2023 0
मुंबई- आज सकाळपासून अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू होती. अजित पवार यांनी त्यांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या आमदाराची…
Eknath And fadanvis

Winter Session : फडणवीसांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांची जाहीर केली भूमिका; म्हणाले शिवसेना…

Posted by - December 8, 2023 0
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) पहिल्याच दिवशी सत्ताधारी बाकावर सर्वात शेवटी बसले, यावरून नवाब…

“पक्ष देईल तो आदेश पाळणारा मी कार्यकर्ता, मी अपक्ष निवडणूक… !” वाचा सविस्तर

Posted by - October 17, 2022 0
मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकी मधून भाजपने अखेर माघार घेतली. राज ठाकरे यांच्या पत्रानंतर शरद पवार यांनी देखील अंधेरी पूर्व…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *