Kolhapur News

Kolhapur News : कोल्हापुरात हिजाबवरून पेटला वाद; कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे जय श्री रामच्या घोषणा देत आंदोलन

490 0

कोल्हापूर : कोल्हापूरमधून (Kolhapur News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये कोल्हापूरमधील (Kolhapur News) विवेकानंद कॉलेजमध्ये हिजाबवरून मोठा वाद झाला झाल्याचे समोर आले आहे. विद्यार्थी भगवा गमजा घालून वर्गात बसल्यानंतर या वादाला तोंड फुटले आहे. जो विद्यार्थी भगवा गमजा घालून बसला होता त्याला शिक्षकांनी वर्गातून बाहेर काढल्यानंतर विद्यार्थी संतप्त झाले आहेत.

Kolhapur News : रस्त्याने जात असताना अचानक गाढवाचा वृद्ध व्यक्तीवर हल्ला; CCTV आले समोर

काय आहे नेमके प्रकरण?
कोल्हापूरमधील विवेकानंद कॉलेजमध्ये हिजाबवरून तणाव निर्माण झाला आहे. भगवा गमजा घालून वर्गात बसलेल्या विद्यार्थ्याला बाहेर काढल्यानं हा वाद चिघळला. त्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी आम्हाला बाहेर काढता, मग मुस्लिम मुली वर्गात हिजाब घालून का बसतात असा प्रश्न विचारत कॉलेजमध्ये आंदोलन केले. यामुळे काही काळ कॉलेजमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Kolhapur News : कोल्हापूर हादरलं ! एकादशी दिवशीच मायलेकराचा दुर्दैवी मृत्यू

कॉलेजमधून विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढल्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी जय श्री राम अशा घोषणाही विद्यार्थ्यांकडून देण्यात आल्या. दरम्यान, अद्याप याबाबत कॉलेज प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Share This News

Related Post

पुण्यात ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का! शर्मिला येवले यांचा युवासेना सहसचिव पदाचा राजीनामा

Posted by - November 19, 2022 0
पुणे : पुण्यात ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शर्मिला येवले यांनी युवासेना सहसचिव पदाचा राजीनामा दिला आहे.…

#PUNE CRIME : पुण्यात भर दिवसा सोन्याच्या दुकानात चोरी, चोरट्याची हातचलाखी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Posted by - February 28, 2023 0
पुणे : पुण्यात भरदिवसा हातचलाखी करत एका ज्वेलरला तब्बल 5 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. या चोरट्याचा सगळा कारनामा सीसीटीव्हीमध्ये…
Ruchesh Jaywanshi

साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची तडकाफडकी बदली

Posted by - June 7, 2023 0
सातारा : साताऱ्याचे (Satara) जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी (Ruchesh Jayavanshi) यांची अचानक राज्य सरकारने बदली (Transfer) केली आहे. महाबळेश्वर पाचगणी कास…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *