केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी

915 0

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे शनिवारी (ता.15 मे) पोलिसांनी ताब्यात घेतले होतं

त्यानंतर आता केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

केतकी चितळे हिला नवी मुंबई पोलिसांनी कळंबोली येथून ताब्यात घेतले आहे. तिचा शोध ठाणे गुन्हे शाखा करत होती. आता ठाणे गुन्हे शाखेची टीम रवाना झाले असून तिला नवी मुंबई पोलिसांकडून ठाणे गुन्हे शाखा ताब्यात घेणार आहे. सध्या कळंबोली इथे असलेल्या तिच्या मावशीच्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. नवी मुंबई पोलिसांकडून ताबा मिळाल्यानंतर केतकी हिला ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले जाणार आहे. त्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

 

केतकीविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुणे सायबर विभागाकडे तक्रारी दाखल करण्यात आली होती.

 

Share This News

Related Post

रुपाली पाटलांचा नारायण राणेंना दम, म्हणाल्या, ‘बेडकासारखे आलात कुठून ? कडेकडेने निघा’

Posted by - June 24, 2022 0
मुंबई- नारायण राणे यांच्यासारख्या केंद्रीय मंत्र्याने शरद पवार साहेबांना पोकळ धमक्या देऊ नयेत, तुम्ही आम्हाला घर गाठणं कठीण करताय, की…

राज्याच्या अर्थसंकल्पाला सुरुवात ; आतापर्यंत कोणत्या विषयासाठी किती निधीची झाली तरतूद ?

Posted by - March 11, 2022 0
महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असून या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत तर…

Ashutosh Gowariker : मराठवाडा हे चित्रपटांचे सक्षम केंद्र बनेल : आशुतोष गोवारीकर

Posted by - January 8, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : आपण जेंव्हा गुजराती आणि बंगाली चित्रपटांबद्दल बोलत असतो तेंव्हा तो (Ashutosh Gowariker) एका विशिष्ट राज्याचा असतो. मात्र,…
ST

ST Bus : एसटी महामंडळाने रचला विक्रम; एका दिवसात 35 कोटींचा टप्पा केला पार

Posted by - November 17, 2023 0
मुंबई : मागच्या अनेक महिन्यांपासून एसटी महामंडळ (ST Bus) मोठ्या प्रमाणात तोट्यात आहे. मात्र मागच्या काही दिवसांपासून लोकांचा एसटीला मोठ्या…

अक्षयकुमारच्या रक्षाबंधन चित्रपटातील ‘कंगन रुबी’ गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद

Posted by - July 6, 2022 0
बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमारच्या अक्षय कुमारने सध्या ‘रक्षा बंधन’ या चित्रपटामध्ये काम केलं आहे. त्याच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *