Maharashtra Politics

Maharashtra Politics : अजित पवारांनी व्यक्त केलेली ‘ती’ भीती खरी ठरणार? महाराष्ट्राच्या राजकारणात येणार नवा ट्विस्ट

706 0

मुंबई : राज्यात सर्व पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Maharashtra Politics) दृष्टीने तयारी सुरु केली आहे. जागा वाटपाबाबत युती आणि महाविकास आघाडीमध्ये सध्या बैठका सुरू आहेत. तसेच घटक पक्षांकडून आपल्या वाट्याला येणाऱ्या संभाव्य जागांचा आढावा देखील घेतला जात आहे. यावेळची लोकसभा निवडणूक (Maharashtra Politics) तसेच विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठी चूरस पाहायला मिळणार आहे. कारण यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती बीआरएसनं महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री केली आहे. यावरून अजित पवार यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांचे कान टोचताना बीआरएसला हलक्यात घेऊ नका असं म्हटलं आहे.

Mumbai Blast Threat Call: मुंबई, पुण्याला उडवण्याची धमकी देणाऱ्या कॉलचे यूपी कनेक्शन समोर

प्रचाराला सुरुवात
महाराष्ट्रातील आगामी निवडणुका (Maharashtra Politics) डोळ्यासमोर ठेवून के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांच्या नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा देखील झाल्या आहेत. इतर पक्षातील अनेक नेते सध्या बीआरएसमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. आता या पक्षाने भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये पहिल्या कार्यालयाचं उद्घाटन केले आहे.

Pravin Raja Karale Pass Away : प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचे निधन

विठ्ठलाचं दर्शन घेणार
के. चंद्रशेखर राव हे आपलं अख्ख मंत्रिमंडळ घेऊन पंढरपुरात येणार आहेत. ते 27 जून रोजी पंढरपुरात येऊन आपल्या मंत्र्यांसह विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत. त्यामुळे आता के. चंद्रशेखर राव हे महाराष्ट्रात आपली छाप पाडण्यात यशस्वी होतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Share This News

Related Post

BIG NEWS : 2025 नवीन पॅटर्न लागू करा; या मागणीसाठी MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात आंदोलन

Posted by - December 19, 2022 0
पुणे : 2025 नवीन पॅटर्न लागू करावा या मागणीसाठी आज एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये मोठे आंदोलन उभे केले आहे.
narendra modi

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव सन्मान पुरस्कार जाहीर; ‘या’ ठिकाणी होणार भव्य सत्कार

Posted by - January 31, 2024 0
सातारा : श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातून देण्यात येणारा मानाचा शिव सन्मान पुरस्काराची घोषणा आज झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी…

“दाऊदच्या माणसांच्या कबरींचे सौंदर्यीकरण चालू आहे.” याकूब मेमनच्या कबर सजावटी वरून भाजपचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल ; पहा फोटो

Posted by - September 8, 2022 0
मुंबई : 12 मार्च 1993 रोजी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे नेतृत्वाखाली मुंबईमध्ये स्फोट घडवून आणण्यात आले होते. यामध्ये 205 नागरिकांचा…

संजय राऊत यांचे मौनव्रत, काय म्हणतात आपल्या ट्विटमध्ये ?

Posted by - March 29, 2022 0
मुंबई – दररोज मीडियासमोर येऊन आपली बाजू मांडणारे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी मौनव्रत धारण केले आहे. त्यांनी ट्विट…

पिंपरी चिंचवडमध्ये भीषण आगीत सात ते आठ कंपन्या खाक

Posted by - April 11, 2022 0
पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरातील सोनवणे वस्ती इथं एका कंपनीला लागलेल्या भीषण आगीत जवळपास सहा ते सात कंपन्या पूर्णपणे खाक झाल्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *