Manoj Jarange Patil

Maratha Reservation : आता फक्त दोन दिवस; आरक्षण मिळालं नाही तर…, जरांगे पाटलांनी सांगितला पुढचा प्लॅन

1381 0

जालना : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी सरकारला चाळीस दिवसांची मुदत दिली होती. येत्या 24 ऑक्टोबरला ही मुदत पूर्ण होत आहे. आपण आरक्षणाबाबतची आपली पुढील भूमिका 22 ऑक्टोबरला स्पष्ट करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं. त्यानुसार आज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाले जरांगे पाटील?
सरकारने येत्या 24 ऑक्टोबरपर्यंत आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर 25 तारखेपासून मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. 25 तारखेपासून जे उपोषण सुरू होईल, तेव्हा कोणतेही वैद्यकीय उपचार घेतले जाणार नाहीत, तसेच पाणी सुद्धा पिणार नसल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की मराठी समाजाला न्याय मिळेपर्यंत हे उपोषण सुरूच राहिल. त्यावेळी गावात एकाही राजकीय नेत्याला एन्ट्री मिळणार नाही असेदेखील ते म्हणाले.

तसेच पुढे बोतलाना जरांगे पाटील म्हणाले की, प्रत्येक सर्कलमध्ये साखळी उपोषणं सर्व गावांच्यावतीने 25 तारखेपासून एकाच ठिकाणी ताकदीने सुरू केली जातील. 28 पासून त्याच साखळी उपोषणाचं रुपांतर आमरण उपोषणात होणार आहे. याची सर्कलनिहाय तयारी मराठा समाजाने केली आहे. सर्व गावांनी सर्कलच्या ठिकाणी एकत्र येऊन कायमस्वरुपी बसून रहायचं. प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात प्रचंड संख्येनं समाजाने एकत्र येऊन कँडल मार्च काढायचे. हे शांततेचं आंदोलन सुरु झाल्यानंतर सरकारला झेपणार नाही.25 तारखेला पुन्हा एकदा आंदोलनाची दिशा सांगणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Share This News

Related Post

ग्लोबल वॉर्मिंगमुळे झालेल्या विस्थापित नागरिकांना फक्त नुकसान भरपाई मिळते, त्यांचे शाश्वत पुनर्वसन होत नाही : ना.डॉ.नीलमताई गो-हे

Posted by - November 16, 2022 0
“जागतिक तापमान वाढीमुळे अनेक नैसर्गिक आपत्ती उदा.पुर,कडे कोसळणे रोगराई इत्यादी यामुळे अनेकदा नागरिकांचे स्थलांतर केले जाते. मात्र या नागरिकांना फक्त…

“Largest Online Album of People Holding National Flag” ; गिनीज जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्धार

Posted by - August 8, 2022 0
पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सव व हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत युवा संकल्प अभियानाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार…
Mandovi Express

Mandovi Express : कोकण रेल्वे मार्गावर मांडवी एक्सप्रेसला आग

Posted by - November 1, 2023 0
मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर मडगांव मांडवी एक्सप्रेसला (Mandovi Express) आग लागल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून लांब…

पोलीस भरती 2022 : पोलीस भरती प्रक्रियेत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत वाढ

Posted by - November 29, 2022 0
मुंबई : पोलीस भरतीत इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना सर्व्हर डाऊन असल्याने राज्यातील अनेक…
Weather Update

Weather Update : आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

Posted by - September 7, 2023 0
पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारल्याने (Weather Update) शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *