Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील उपोषण सोडण्यास तयार; पण सरकारसमोर ठेवली ‘ही’ अट

627 0

जालना : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली आहे. जात बदनाम होऊ नये, म्हणून दोन पावले मागे हटत आहे. मी आमरण उपोषण सोडण्यास तयार आहे. पण जागा सोडणार नाही. महिन्याभरात सरकारने आरक्षण दिले नाही तर सरकार तोंडावर पडेल, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. तसेच सरकारला वेळ दिला तरी माझे आंदोलन थांबणार नाही. मी सरकारला एक महिन्याचा वेळ दिला. आतपर्यंत आपण 40 वर्ष दिली आता एक महिना देऊ या. यानंतर टिकणारे आरक्षण मिळेल, असा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मराठा आरक्षण आणि जालना येथील अंतरवाली सराटी गावात सुरु असलेया मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सोमवारी सर्वपक्षीय बैठक झाली. दरम्यान, या बैठकीचा मसुदा मंत्री संदिपान भुमरे आणि अर्जुन खोतकर यांनी जरांगे यांच्याकडे दिला आहे. त्यानंतर जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

‘सर्वपक्षीय बैठकीत सरकराने दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची घोषणा केली आहे. तसेच गावकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली आहे. पण आरक्षणाचं काय?, कालच्या बैठकीत सरकारनं आरक्षणावर कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे सरसकट आरक्षणाचा पत्र जेव्हापर्यंत माझ्या हातात आणि शेवटच्या मराठाच्या हातात पडत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका जरांगे यांनी स्पष्ट केली आहे. तसेच उपोषण सोडताना मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री तसेच उदयनराजे आणि छत्रपती संभाजीराजे यांनी उपोषणस्थळी यावे अशी मनोज जरांगे पाटील यांनी अटदेखील घातली.

Share This News

Related Post

Pune Prakalp

पुण्यात तयार होणार पहिला कचर्‍यातून हायड्रोजन निर्मितीचा प्रकल्प

Posted by - June 3, 2023 0
पुणे : शहरात तयार होणाऱ्या महाकाय कचऱ्याच्या डोंगराची डोकेदुखी येत्या दिवाळीपर्यंत बंद होणार आहे. महापालिका प्रशासन केंद्राच्या मदतीने दररोज 350…
Nilesh Lanke and ajit pawar

Nilesh Lanke : आपल्याला निलेश लंकेंचा बंदोबस्त करायचाय; अजित पवारांनी भरसभेत दिला इशारा

Posted by - May 10, 2024 0
अहमदनगर : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी प्रचाराचा जोरदार धडाका सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित…

राज ठाकरे 3-4 महिने भूमिगत असतात – शरद पवार

Posted by - April 3, 2022 0
“सर्व जातीच्या लोकांना एकत्र घेऊन पुढे नेण्याची राष्ट्रवादीची भूमिका आहे. गेल्या काही वर्षातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इतिहास राज ठाकरे यांनी…
Maratha Reservation

Maratha Reservation : राज्यात आतापर्यंत आढळल्या 57 लाख कुणबी नोंदी

Posted by - January 30, 2024 0
मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर (Maratha Reservation) राज्यात कुणबी नोंदींचा शोध घेण्याचं काम राज्य सरकारनं युद्धपातळीवर हाती…

BREAKING : राज्यात ओबीसी आरक्षणासह निवडणुकांचा मार्ग मोकळा

Posted by - July 20, 2022 0
महाराष्ट्र : बांठिया आयोगाच्या अहवालानुसार राज्यात ओबीसी आरक्षणासह निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.दोन आठवड्यात उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नोटिफाय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *