School

Teacher Recruitment : ZP शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या आता कायमच्या बंद; ‘पवित्र’द्वारे होणार भरती

1193 0

सोलापूर : राज्यातील जिल्हा परिषदा, नगरपालिका व महापालिकांमधील 23 हजार तर खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील 8 ते 10 हजार शिक्षकांची (Teacher Recruitment) भरती होणार आहे. पवित्र पोर्टलवर सध्या नावनोंदणी सुरु असून आता नवनियुक्त शिक्षकांची आंतरजिल्हा बदली कायमची बंद होणार आहे. त्यासाठी नव्याने निवड होणाऱ्या शिक्षकांना तसे संमतिपत्र द्यावे लागणार आहे.

राज्यात जिल्हा परिषदांच्या 70 हजार शाळा आहेत. या शाळांमध्ये 65 ते 68 लाख विद्यार्थी आहेत. स्थानिक स्वराज संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या तुलनेत अंदाजे 28 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. दुसरीकडे खासगी अनुदानित शाळांमध्येही 30 हजारांपर्यंत पदे रिक्त आहेत. 2019 नंतर शिक्षक भरती झालेली नाही, दुसरीकडे कोरोनामुळे शासकीय पदभरतीवर निर्बंध होते. डी.एड, बी.एडनंतर टेट, टीईटी उत्तीर्ण होऊनही चार ते पाच लाख उमेदवारांना शिक्षक भरतीची प्रतीक्षा होती.

काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी लवकरच शिक्षक भरती होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता ‘पवित्र’ पोर्टलद्वारे सर्वच शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. भरती प्रक्रिया सुरु झाल्याने ‘शिक्षण सारथी’ योजनेतून सेवानिवृत्त शिक्षकांच्या नेमणुका देखील थांबविण्यात आल्या आहेत.ऑक्टोबरअखेर ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. आता आंतरजिल्हा बदल्यानंतर कोकणसह इतर विभागांमध्ये वाढलेल्या शिक्षकांच्या रिक्तपदांमुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या बदल्यांची पद्धत कायमची बंद करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे.

शिक्षक भरतीची स्थिती
शासकीय शाळांमधील पदे – 23,000
‘खासगी अनुदानित’मधील पदे – 8 ते 10 हजार
एकूण शिक्षक भरती – 33,000
भरतीचा कालावधी – 3 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर

Share This News

Related Post

” मेट्रो ३ प्रकल्प सार्वजनिक वाहतुकीची सुविधा देण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास पूरक ठरेल “…! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - August 30, 2022 0
मुंबई : राज्य शासन पायाभूत सुविधांना प्राधान्य देत आहे. त्याअंतर्गत मुंबईकरांसाठी नव्याने लाईफ लाईन ठरणारा मेट्रो ३ प्रकल्प सार्वजनिक वाहतुकीची…

मनसेचा वर्धापन दिन उद्या पुण्यात राज्यभरातून हजारो मन सैनिक पुण्यात दाखल होणार

Posted by - March 8, 2022 0
महापालिका निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केलीय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी…

पुणे : राज्यपालांचे फेडले धोतर; जाळली काळी टोपी; छत्रपती शिवाजी महाराजांबाबत संतापजनक वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे डमी राज्यपालांचे धोतर फेडून अनोखे आंदोलन

Posted by - November 21, 2022 0
पुणे : सध्या राज्यभरामध्ये राहुल गांधी यांनी सावरकरांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण तापलेले असताना, त्यातच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी…
Maharashtra Politics

Maharashtra Politics : काँग्रेस आणि ठाकरे गटाला मोठा धक्का ! बसवराज पाटील, रश्मी बागल यांचा भाजपमध्ये प्रवेश

Posted by - February 27, 2024 0
मुंबई : मराठवाड्यात काँग्रेसला तर सोलापुरात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला (Maharashtra Politics) आहे. मराठवाड्यातील नेते बसवराज पाटील आणि सोलापुरातील…
pune-police

पोलीस आयुक्तालयात दोन उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या; तर सात पोलीस उपायुक्त नवनियुक्त

Posted by - November 15, 2022 0
पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये दोन पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. तर नव्यानेच बदलून आलेल्या सात पोलीस उपायुक्तांच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *