Nashik News

Nashik News : कुस्तीचा सराव करत असताना जवानाला वीरमरण

314 0

नाशिक : चांदवड तालुक्यातील (Nashik News) हरनूल येथील भारतीय सैन्य दलातील जवान श्रीनगर येथे कार्यरत होते कुस्तीचा सराव सुरु असताना त्यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. ते अवघे 25 वर्षांचे होते. आपल्या तरुण मुलाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने चव्हाण कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. विक्की अरूण चव्हाण असे मृत जवानांचे नाव आहे. ते श्रीनगर येथील पुंछ राजोरी येथे महार रेजिमेंट मध्ये कार्यरत होते. ते स्वतः कुस्तीपटू असल्याने अनेक स्पर्धांच्या निमित्ताने सराव करत असायचे. काल सायंकाळी कुस्तीचा सराव सुरु असताना त्यांना वीरमरण आले.

विक्की चव्हाण हे गेल्या साडे चार वर्षांपासून भारतीय सैन्यदलात कार्यरत होते. श्रीनगर येथील पुंछ राजोरी येथे महार रेजिमेंट मध्ये कार्यरत होते. पहिल्यापासून कुस्तीची आवड असल्याने ते भारतीय सैन्य दलाकडून देखील कुस्ती खेळत असत. याच माध्यमातून चव्हाण यांची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत निवड झाली होती. पुढील महिनाभरात ही स्पर्धा होणार होती. त्यामुळे चव्हाण यांची जोरदार तयारी सुरु होती. नेहमीप्रमाणे काल सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास कुस्तीचा सराव सुरु असताना अपघात झाला आणि यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

त्यांच्या निधनाची बातमी समजताच चांदवड येथील त्यांच्या कुटूंबियांना समजल्यावर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या ह्या दुर्दैवी निधनाने हरनूल गावासह संपुर्ण चांदवड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

Share This News

Related Post

Devendra Kumar Upadhye

Devendra Kumar Upadhye : मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्तीपदी न्या. देवेंद्र उपाध्याय यांची नियुक्ती

Posted by - July 25, 2023 0
मुंबई : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय (Devendra Kumar Upadhye) यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून…
drowning hands

पोटच्या मुलाला वाचवण्याच्या नादात पाण्यात बुडून मायालेकरांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 5, 2023 0
जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये पाण्यात बुडून मायालेकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला…
Pune Crime News

Pune Crime News : कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या; पुण्यातील चंदननगरमधील घटना

Posted by - August 24, 2023 0
पुणे : कौटुंबिक वादातून महिलेवर पतीने चाकुने वार केल्याची घटना खराडी (Pune Crime News) परिसरात घडली आहे. विशेष म्हणजे आपल्या…
Shivsena

Shivsena : शिवसेना कुणाची? ठरवण्यासाठी योग्य पुरावे सादर करा विधीमंडळ सचिवांची दोन्ही गटांना नोटीस

Posted by - October 9, 2023 0
मुंबई : शिवसेना (Shivsena) आमदार अपात्रतेच्या सुनावणीचं वेळापत्रक ठरलं आहे. आता शिवसेना कुणाची? हे ठरवण्यासाठी विधीमंडळाच्या कार्यवाहीला वेग आला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *