राज्यभरातील जिल्हा वार्षिक आराखड्यांना स्थगिती; शिवतारेंच्या मागणीनंतर सरकारकडून तातडीने परिपत्रक 

226 0

पुणे जिल्ह्यात मागील पालकमंत्र्यांनी सरकार कोसळण्याच्या आधी घाईघाईत मंजूर केलेल्या जिल्हा वार्षिक आराखड्यामध्ये राष्ट्रवादीच्या सदस्यांवर निधीची खैरात करून शिवसेना, काँग्रेस आणि भाजपच्या सदस्यांना अंधारात ठेवल्याची बाब माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सरकारने तातडीने परिपत्रक काढून या आराखड्यातील निधीवाटपास आज स्थगिती दिली. केवळ पुणे जिल्हाच नव्हे तर राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी सरकारने हे परिपत्रक आज जारी केले.

नाशिक जिल्ह्यात देखील असाच प्रकार घडला होता. तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राजकीय स्थित्यंतर घडण्याची शक्यता लक्षात घेऊन जवळपास ६५० कोटींचा आराखडा घाईघाईत मंजूर केला. याबाबत माजी आमदार सुहास कांदे यांनी तक्रार केली होती. शिवतारे यांनी ही बाब लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यातील निधी वाटपाची माहिती घेतली. गुपचूप राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या याद्या मागवून मोठा निधी लंपास केला असल्याचे लक्षात येताच शिवतारे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे धाव घेतली. दोघांनी याची गंभीर दखल घेत राज्यभरासाठी उपाययोजना करण्याचे आदेश नियोजन विभागाला दिले. त्यानुसार या आराखड्यांना स्थगिती दिली. आता नवीन पालकमंत्री आल्यावर या आराखाड्यांचा फेर आढावा घेऊन निधीचे फेरवाटप होईल असे आदेश शासनाने काढले आहेत.

निधीवाटप समन्यायी व्हावे – शिवतारे

याबाबत शिवतारे म्हणाले, पुणे जिल्ह्यात ८७५ कोटींचा आराखडा घाईघाईत मंजूर करण्यात आला. त्यात राष्ट्रवादीच्या सदस्यांना शेकडो कोटींचा निधी देण्यात आला आहे. काँग्रेस, शिवसेना, भाजप या पक्षाच्या सदस्यांना भणक सुद्धा लागू न देता निधीवाटप झाले. त्यामुळे आता नवीन सरकार समन्यायी वाटप करेल असेही ते म्हणाले.

Share This News

Related Post

” अमृता फडणवीस..,चितळे यांच्या बद्दल उपमुख्यमंत्री कधीही का बोलत नाहीत? ” सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला

Posted by - January 3, 2023 0
पुणे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई यांच्या नायगाव जन्मगावी आज अनेकांनी हजेरी लावून अभिवादन केले. पुण्यातील अभिवादन कार्यक्रमासाठी…

दत्तात्रेय जयंती 2022 : श्री दत्तजयंतीचे महत्व, दत्तात्रेय बीज मंत्र, गुरुचरित्र वाचन सप्ताह समाप्ती, पौर्णिमा तिथी वाचा सविस्तर माहिती

Posted by - December 7, 2022 0
दत्तात्रेय जयंती 2022 : दत्तजयंती ही हिंदू पंचांगात असलेल्या मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला साजरी केली जाते. हा दिवस म्हणजे भगवान दतात्रेय…

संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार – सचिव सुमंत भांगे

Posted by - March 13, 2023 0
मुंबई : दि. १४ मार्च पासूनच्या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे…
Narendra Dabholkar

डॉ. नरेंद्र दाभोलकर खून तपासाप्रकरणी सुप्रीम कोर्टाची सीबीआयला नोटीस

Posted by - May 19, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डॉ नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या खूनाच्या प्रकरणातील तपास बंद करण्याच्या सीबीआयच्या (CBI) निर्णयाच्या…

Chandrakant Patil : कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचा कोर्स पूर्ण होईपर्यंतची फी भरणार

Posted by - August 22, 2022 0
मुंबई : कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचा आता जो कोर्स (अभ्यासक्रम) आहे (उदा. मेडीकल, इंजिनिअरींग किंवा इतर कोणताही) तो…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *