नेमका कसा झाला विनायक मेटेंचा अपघात; पोलीस अहवाल TOP NEWS मराठीच्या हाती

597 0

मुंबई: शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचं  अपघाती निधन झाले. मेटे यांच्या गाडीला आज रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.  दरम्यान मेटेंचा नेमका अपघात कसा झाला याबाबत आता पोलीस अहवाल समोर आला आहे.

असा आहे पोलिसांचा अहवाल

अपघात ठिकाण व वेळ : आज दि.13/08/2022 रोजी पहाटे 05.05 वा. चे सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे मुंबई लेनवर किमी नं.km15/900 येथे रसायनी पोलीस ठाणे हद्दीत प्राणांतिक अपघात घडला.

अपघातातील वाहन 1) फोर्ड Endeavour क्र.MH 01 DP 6364

अपघाताचे कारण : नमूद वेळी व तारखेस फोर्ड Endeavour MH 01 DP 6364 चालक एकनाथ कदम हे विनायक मेटे(केज-बीड) यांना घेऊन मुंबई बाजूकडे दुसरे लेनने जात असताना कार चालक यांचा त्यांच्या गाडीवरील त्यांचा ताबा सुटून पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला ठोकर मारून अपघात झाला आहे. सदर अपघातात विनायक मेटे हे अत्यंत गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ आयआरबी ॲम्बुलन्स एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचारा कामी दाखल केले असता डॉ.धर्मांग यांनी तपासून मयत घोषित केले आहे. बाॅडीगार्ड पोलिस हवालदार राम ढोबळे हे कारमध्ये अडकल्याने कारमधून बाहेर काढून आय आर बी रुग्णवाहिकेने तात्काळ MGM हॉस्पिटल,कामोठे येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. कार आयआरबी क्रेनच्या साह्याने रस्त्याचे बाजूला घेतली आहे. सदर वेळी आम्ही PSI चव्हाण तसेच रसायनी पोलीस स्टेशन API बालवडकर व स्टाफ तसेच IRBचे नवनाथ गोळे आणि स्टाफ हजर होते. सदर अपघाताची माहिती रसायनी पोलीस स्टेशनला दिली आहे.

मात्र, मेटेंचा अपघात नेमका कसा आणि कोणामुळे झाला याबाबत पोलिसांचे ८ पथक तपास करत आहेत. लवकरच सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील, अशी माहिती पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी दिली.

Share This News

Related Post

Pratap Sarnaik

Pratap Sarnaik : आमदार प्रताप सरनाईक यांची 7 कोटी 66 लाखांची फसवणूक; पोलिसांत गुन्हा दाखल

Posted by - July 28, 2023 0
ठाणे : आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांची 7 कोटी 66 लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यांची फसवणूक करणाऱ्या…

#PUNE : ओपन जिममध्ये व्यायाम केल्यानंतर तरुणाचा अंत विजेचा धक्का लागून नाही ! महावितरण अहवालानुसार …

Posted by - March 21, 2023 0
पुणे : ओपन जिममध्ये व्यायाम केल्यानंतर फोनवर बोलत असताना तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. अमोल शंकर नाकते (वय २१ वर्ष) या…

धक्कादायक ! शॉर्ट कपडे घातल्याच्या कारणातून पुण्यात काही तरुणींना मारहाण

Posted by - March 5, 2022 0
शॉर्ट कपडे घालून परिसरात फिरतात म्हणून पुण्यात काही तरुणींना चप्पलने मारहाण करण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार खराडी येथील रक्षक…

गुजरात विधानसभा निवडणूक: भाजपा 53 तर काँग्रेस 15 जागांवर आघाडीवर

Posted by - December 8, 2022 0
राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल आता पुढे येण्यास सुरुवात झाली असून गुजरात मध्ये 53…

उमेश कोल्हे हत्याकांड : गुप्तचर विभागाकडून उद्धव ठाकरे यांच्या फोनची होणार चौकशी; शंभूराज देसाई यांची सभागृहात माहिती

Posted by - December 23, 2022 0
नागपूर : उमेश कोल्हे हत्याप्रकरणी गुप्तचर विभागाकडून उद्धव ठाकरेंच्या फोनची चौकशी होणार असल्याची आज शंभूराज देसाई यांनी घोषणा केली. उद्धव…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *