लडाख येथील अपघातात साताऱ्याच्या फलटण येथील जवान वैभव भोईटे यांना वीरमरण

1075 0

देशसेवा बजावत असताना लडाख येथे जवानांच्या गाडीचा अपघातात 9 जवानांना वीरमरण आले.. त्यामध्ये सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील राजाळे गावचे सुपूत्र वैभव संपतराव भोईटे यांना लडाख मध्ये वीरमरण आले आहे..लडाख मधील लेहजवळ कायरी भागात भारतीय लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघातात त्यांना हौतात्म्य आले असून भोईटे कुटुंबियांसह गावावर शोककळा पसरली आहे.

2018 मध्ये वैभव भोईटे हे आर्मीमध्ये भरती झाले होते. ते विवाहित असून त्यांची पत्नी पोलीस सेवेत कार्यरत आहे. एक लहान मुलगी आहे.
आई, वडील,लहान भाऊ दोन विवाहित बहीण असा परिवार आहे.

लडाखमधील कायरी भागात भारतीय लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. लष्काराचे वाहन दरी कोसळून झालेल्या या अपघातात 9 जवानांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील जवान वैभव भोईटे यांचा समावेश आहे.. तर काही जवान जखमी असल्याचे वृत्त आहे.

अपघातग्रस्त लष्कराच्या ट्रकमध्ये 2 जेसीओ आणि 7 जवान होते. एकूण 34 कर्मचार्‍यांसह एक यूएसव्ही, ट्रक आणि अॅम्ब्युलन्ससह 3 वाहनांची ही रेकी करणारे पथक असल्याची प्राथमिक माहिती आहे.
भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी, सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास लष्कराचा ट्रक अपघातग्रस्त झाला. क्यारी शहरापासून 7 किमी दूर अंतरांवर हा अपघात झाला आहे. जवान असलेला ट्रक दरीत कोसळला. भारतीय जवान कारू गॅरीसनहून सध्या लेहजवळील क्यारीच्या दिशेने जात होते.

Share This News

Related Post

Death of Trekker

Death of Trekker : हरिशचंद्र गडावर गेलेल्या त्या पर्यटकाचा मृत्यू नेमका कसा झाला? 2 दिवसांनी समोर आलं धक्कादायक कारण

Posted by - August 9, 2023 0
नाशिक : सध्या पावसाळा सुरु असल्याने अनेक पर्यटन स्थळी पर्यटकांची मोठ्या (Death of Trekker) प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. पावसाळी…

सरदार पटेलांच्या निजामावरील पोलिस ॲक्शनप्रमाणेच प्रधानमंत्री, गृहमंत्र्यांची कश्मीरमधून ३७० कलम हटविण्याची हिम्मत

Posted by - September 18, 2022 0
मुंबई: कश्मीर मधून 370 कलम हटविण्याची हिंमत प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांनी दाखविली आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. हैदराबाद मुक्ती संग्रामानिमित्त…

मोठी बातमी! क्रिकेटर केदार जाधवच्या वडिलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश

Posted by - March 27, 2023 0
पुणे: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू केदार जाधवच्या वडिलांना शोधून काढण्यात अखेर पोलिसांना यश आले असून मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घोरपडीमध्ये…

पासपोर्ट पडताळणीसाठी पोलीस कार्यालयात येण्याची गरज नाही, मुंबई पोलीस आयुक्तांचा निर्णय

Posted by - March 12, 2022 0
मुंबई- मुंबईचे आयुक्त संजय पांडे यांनी पासपोर्ट व्हेरिफिकेशन संदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता मुंबईकर नागरिकांना पासपोर्ट पडताळणीसाठी मुंबई पोलिसांच्या…
Firing

पुण्यात मध्यरात्रीच्या सुमारास सराईत गुन्हेगारावर गोळीबार

Posted by - June 6, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास एक खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये एका सराईत गुन्हेगारावर गोळीबार करण्यात आला आहे. वानवडी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *