Railway

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! कन्फर्म तिकिटावर करू शकणार दुसरा प्रवास

2892 0

पुणे : रेल्वे (Railway) प्रवासासाठी काढलेले तिकीट हे अहस्तांतरणीय असते मात्र आता तुम्ही तुमचे कन्फर्म तिकीट (Confirm ticket) रक्ताच्या नात्यातील कुठल्याही अन्य प्रवाशाला ट्रान्सफर करू शकणार आहात. त्यासाठी रेल्वेने काही नियमांमध्ये बदल केला आहे. यापूर्वी तुम्ही तुमच्या कन्फर्म तिकिटावर कुणी अन्य व्यक्ती प्रवास करताना आढळला तर त्याला गुन्हा मानला जात असे.

सोप्या भाषेत सांगायचं तर तिकीट बुक केल्यानंतर काही कारणानं तुम्हाला प्रवास करणं शक्य झालं नाही तर तुम्हाला कन्फर्म तिकीट कॅन्सल (Cancel Ticket) करावे लागत होतं. आता मात्र तसं करावं लागणार नाही. कॅन्सल केल्यावर रेल्वे प्रवाशांना अनेकदा आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत असे. त्यामुळे इंडियन रेल्वेने आता आरक्षित तिकिटांवर प्रवाशांना खास प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

त्याअंतर्गत जे लोक कन्फर्म तिकिटावर प्रवास करू इच्छित नाही त्यांना तिकीट ट्रान्सफर (Ticket Transfer) करता येणार आहे. तिकीट ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला एक अ‍ॅप्लिकेशन स्टेशन मास्टर यांना द्यावे लागेल. याद्वारे तुम्ही तुमच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला तुमचे कन्फर्म तिकीट ट्रान्सफर करू शकता. रेल्वेच्या या निर्णयानं रेल्वे प्रवाशांना आता काहीसा दिलासा मिळणार आहे.

Share This News

Related Post

आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

Posted by - December 13, 2022 0
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले जलयुक्त शिवार अभियान २.० सुरु…

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या ‘द इंडिया वे’ चा अनुवाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार प्रकाशित

Posted by - January 24, 2023 0
पुणे : परराष्ट्रमंत्री मा. श्री. एस. जयशंकर यांनी लिहिलेल्या ‘द इंडिया वे’ या इंग्रजी भाषेतील पुस्तकाचा ‘भारत मार्ग’ या शीर्षकाने…

लाइक बटनावर क्लिक केले आणि माजी सैनिकाच्या खात्यातून १ कोटी लंपास झाले

Posted by - April 4, 2023 0
पुणे शहरात ऑनलाईन फसवणूक होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. क्षणिक मोहापायी सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकून लोक लाखो रुपयांची फसवणूक…

१४ तासानंतर सापडला संगणक अभियंत्याचा मृतदेह, पुणे जिल्ह्यातील घटना

Posted by - April 8, 2023 0
पानशेत परिसरातील धिंडली (वरघड) येथील एका रिसॉर्टच्या बॅक वॅाटरच्या पाण्यात परप्रांतीय सॉफ्टवेअर अभियंत्याचा पाय घसरून पडल्याची घटना शुक्रवारी (ता. ०७)…
Mumbai Goa Highway

Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गावर LPG टँकर पलटी; मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प

Posted by - August 12, 2023 0
मुंबई : मुंबई गोवा महामार्गावर LPG टँकर पलटी झाल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *