Girish Chaudhari Bail

Girish Chaudhary Bail : एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना जामीन मंजूर

508 0

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना (Girish Chaudhary Bail) अखेर सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांना (Girish Chaudhary Bail) मनी लॉनड्रिंगच्या गुन्हयात ईडीकडून अटक करण्यात आली होती. पुणे एमआयडीसी भूखंड घोटाळाप्रकरणी गिरीश चौधरी हे दीड वर्षांपासून ईडीच्या ताब्यात होते.

Jalgaon News : खडसे-गुलाबराव पाटील यांच्यातील ‘तो’ वाद 4 वर्षानंतर अखेर मिटला; काय आहे नेमके प्रकरण?

काय होते प्रकरण?
हे प्रकरण 2016 मधील आहे. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे, जावई गिरीश चौधरी (Girish Chaudhary Bail) यांच्या नावाने भोसरी येथे एमआयडीसीमध्ये जागा खरेदी केल्याचा आरोप होता. खडसेंनी मंत्रीपदाचा गैरवापर करून कमी किंमतीत ही जागा खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी झोटिंग समिती नेमण्यात आली होती.

“या आरोपामुळे माझ्या परिवाराला अत्यंत वेदना झाल्या…!” गिरीश महाजन यांच्या आरोपानंतर एकनाथ खडसे त्यांचे कुटुंबीय भावनिक

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा करण्यात आला होता. सदर भूखंड हा अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने 1971 मध्ये तो अधिग्रहण केला होता. या सगळ्या आरोपांमुळे एकनाथ खडसे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

Share This News

Related Post

Mumbai Firing

Mumbai Firing : मुंबईत दिवसाढवळ्या गोळीबार! 1 ठार तर 3 जण जखमी

Posted by - December 24, 2023 0
मुंबई : मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये भरदिवसा झालेल्या गोळीबारामुळे (Mumbai Firing) मुंबई हादरली आहे. मुंबईतील चुनाभट्टीच्या…

आनंद महिंद्रांनी केलं आदित्य ठाकरेंचं कौतुक

Posted by - April 17, 2022 0
वेगवेगळ्या कल्पनाशक्तींचे कौतुक करणारे उद्योगपती म्हणून महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांची ओळख सर्वश्रुत आहे. उद्योग-व्यवसाय वाढवण्याच्या अनोख्या, डोकेबाज कल्पनांचं…

होळी, धुळवड साजरी करण्याबाबतची नियमावली मागे, ठाकरे सरकारचा निर्णय

Posted by - March 17, 2022 0
मुंबई- होळी आणि धुळवड साजरी करण्यावर राज्य सरकारकडून काही निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र या निर्बंधाला विरोधकांकडून होत असलेला…
Ajit Pawar And Devendra Fadanvis

Maratha Aarakshan : ‘कार्तिकी महापूजेला आल्यास उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडाला काळे फासू…’, मराठा समाजाने दिला इशारा

Posted by - October 28, 2023 0
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीतील सभेत मराठा आरक्षण (Maratha Aarakshan) व मराठा समाजाबद्दल एक अक्षरही काढले नाही. यावरून…

संजय राऊतांवर ही कारवाई अपेक्षित होती – छगन भुजबळ

Posted by - July 31, 2022 0
संजय राऊत यांच्या ईडी कारवाईवर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.छगन भुजबळ म्हणाले, राऊतांवर ही कारवाई अपेक्षित…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *