CM EKNATH SHINDE : ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास ; १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळणार लाभ

357 0

मुंबई : देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास योजनेचा लाभ सुमारे १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना होणार असून एसटीच्या शिवनेरीसह सर्व सेवांसाठी ही मोफत प्रवास योजना लागू असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

See the source image

विधीमंडळाच्या समिती कक्षात ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजनेसाठी ज्येष्ठांना प्रमाणपत्रांचे वितरण आणि योजनेचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आमदार भरत गोगावले, प्रताप सरनाईक, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंग, महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, महाव्यवस्थापक शिवाजी जगताप, अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

राज्य परिवहन महामंडळाद्वारे ज्येष्ठ नागरिकांची ३४ लाख ८८ हजार स्मार्ट कार्डची नोंदणी झालेली आहे. त्यापैकी ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या १४ लाख ६९ हजार आहे. सध्या राज्यात ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसेस मधून प्रवासासाठी ५० टक्के सवलत दिली जाते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी १६ ऑगस्ट २०२२ रोजी राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवासाची घोषणा केली होती. त्याचा शुभारंभ आज झाला. याप्रसंगी श्रीमती आनंदी गुरव, रमेश खाडे, विजय औंधे, बाबाजी चिपळूणकर, चंद्रमोहन परब यांना प्रातिनिधिक स्वरूपात मोफत प्रवास सवलत प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

या योजनेअंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बसमधून प्रवासादरम्यान वाहक शून्य मूल्य वर्ग तिकीट देतील. विशेष म्हणजे मोफत प्रवासाची ही सवलत एस टीच्या सर्व सेवांसोबतच शिवनेरी बस सेवेसाठी देखील लागू असणार आहे,असे व्यवस्थापकीय संचालक श्री. चन्ने यांनी प्रास्ताविकात सांगितले.

सवलत योजनेची वैशिष्ट्ये :

वातानुकुलीत, शयनयानसह सर्व सेवा प्रकारांमध्ये ही सवलत अनुज्ञेय आहे. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवांमध्ये ५० टक्के सवलत मिळत आहे. आता वातानुकुलीत, शयनयान आणि शिवनेरी या उच्चश्रेणी सेवांनाही ही सवलत लागू होणार आहे.

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बसमधून मोफत प्रवासासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र व केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास शून्य मूल्य वर्गाचे तिकीट देऊन मोफत प्रवास करता येईल.

Share This News

Related Post

Eknath And Devendra

Loksabha : महायुतीत ‘या’ जागेचा तिढा अद्यापही सुटेना; 1 जागा अन् 3 इच्छुक?

Posted by - April 24, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha) रणसंग्रामाला सुरूवात झाली आहे. निवडणुकीचा पहिला टप्पादेखील पार पडला. मात्र या दरम्यान 1 जागा अशी…

18 फेब्रुवारी पासून दहावी चे हॉल तिकीट मिळणार ऑनलाईन. कसे कराल डाऊनलोड ? 

Posted by - February 17, 2022 0
बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढील महिन्यात पार पडणार आहेत. वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा 4 मार्चपासून सुरू होत…
pune police

Pune Police News : वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - June 28, 2023 0
पुणे : विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये (Pune Police News) सध्या गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दर्शना पवार हत्याकांडाने…

केतकीचा पाय आणखी खोलात ! 2020 चे अट्रोसिटी प्रकरणी केतकी रबाळे पोलिसांच्या ताब्यात

Posted by - May 19, 2022 0
नवी मुंबई- शरद पवार यांच्यावर फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणी वाढत आहेत. आता अट्रोसिटीच्या गुन्ह्यासाठी तिला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *